HOME   लातूर न्यूज

लाइफ लाईन एक्सप्रेसचा लाभ घेण्याकरिता बस सेवा सुरु


लाइफ लाईन एक्सप्रेसचा लाभ घेण्याकरिता बस सेवा सुरु

लातूर: लातूर शहर महानगर पालिकेच्या वतीने लातूर शहरतील नारिकाना लातूर रेल्वे स्टेशन येथे आलेल्या लाइफ लाईन एक्सप्रेस येथे मोफत दिल्या जाणार्‍या उपचार सेवेचा लाभ व्हावा, याकरिता शहरातील नागरिकांनी त्यास भेट द्यावी या उद्देशाने लातूर मनपाच्या वतीने बस सेवा सुरु करण्यात आली आहे, त्याचे उदघाटन महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी हिरवा झेंडा दाखून केली, यावेळी स्थायी समिती साभाग्रह नेते शैलेश गोजमगुंडे, उपायुक्त संभाजी वाघमारे, नगर सेवक शैलेश स्वामी, संगीत रदाळे, तुळशीराम दुडीले, गोरोबा गाडेकर, हनुमंत जाकते, गुरुनाथ मग्गे, मंगेश बिराजदार, गणेश गोमचाले, मनपातील विभाग प्रमुख रमाकांत पिड्गे, सुर्यकांत राउत, रुक्मांनद वडगावे, कलीम शेख आदीसह नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते.


Comments

Top