HOME   लातूर न्यूज

यलम समाजातील जात पडताळणी प्रकरणे त्‍वरीत निकाली काढा

विक्रांत गोजमगुंडे यांच्या शिष्‍ट मंडळाची अध्‍यक्षांकडे मागणी


यलम समाजातील जात पडताळणी प्रकरणे त्‍वरीत निकाली काढा

लातूर: सर्वञ विविध अभ्‍यासक्रमांना प्रवेश घेण्‍याची लगबग सुरू असताना यलम समाजातील विदयार्थ्‍यांना जात पडताळणी प्रमाणपञ विलंब्‍याने भरत असल्‍याने मोठया अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे विदयार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे याची दखल घेत आज नरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्‍यासह शिष्‍ट मंडळाने जाती प्रमाणपञ पडताळणी समितीच्‍या अध्‍यक्षांची भेट घेवून त्‍यांच्‍याशी चर्चा केलीव प्रलंबीत प्रकरणे त्‍वरीत निकाली काढण्‍याची मागणी केली. यावेळी त्‍यांच्‍या सोबत श्री.चेतन कोले, श्री.संतोष साबदे,श्री.विशाल चामे, श्री.बालाजी वलाकटे, श्री.संजय गोमारे, श्री.व्‍यंकट नागमोडे, श्री.राधाकिशन कासले, डॉ. न‍रसिंह भिकाने इत्‍यादी उपस्‍थीत होते. लातूर जिल्‍हयात प्रामुख्‍याने वास्‍तव्‍यास असणारे आणि इतर मागास प्रर्वगात मोडणारे यलम ( रेड्डी ) जातीच्‍या विदयार्थ्‍यांची पडताळणी प्रकरणे प्रलंबीत असून यलम व रेड्डी एकाच जातीची नावे असून स्‍वातंत्र्यपूर्व निजाम राजवटित लातूर परीसराचा भाग मोडत असे त्‍यामुळे अनेकांच्‍या पूर्वजांच्‍या दस्‍तावेजांवर रेड्डी असा नामोल्‍लेख आढळून येतो. मा. सर्वोच्‍च न्‍यायालय व उच्‍च न्‍यायालयाने अशी प्रकरणे निकाली काढण्‍याबाबत वेळोवेळी आदेशित केले आहे. त्‍यामुळे तांञीक ञुंटिमुळे प्रकरणे प्रलंबीत न ठेवता, विदयार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी यलम ( रेड्डी ) समाजातील प्रलंबीत जात प्रमाणपञ प्रकरणे तात्‍काळ निकाली काढावीत अशी मागणी शिष्‍ट मंडळानी केली. यावर कार्यवाही करत जाती प्रमाणपञ पडताळणी अध्‍यक्षांनी सर्व प्रकरणे तात्‍काळ निकाली काढण्‍याचे आदेश संबंधितांना दिले.


Comments

Top