logo

HOME   टॉप स्टोरी

चव्हाण खून: सहाही आरोपींना वाढीव पोलिस कोठडी

आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता

लातूर: जिल्हाभर आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चेत असलेल्या स्टेप बाय स्टेप क्लासचे संचालक अविनाश चव्हाण खून प्रकरणातील सहाही आरोपींना आज न्यायालयात उभे करण्यात आले. या सर्वांना आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सहा जणात प्रा. चंदनकुमार छोटेलाल शर्मा, किरण गहेरवार, अक्षय शेंडगे, महेशचंद्र गोगडे (रेड्डी), शरद घुमे आणि परवा सापडलेला पिस्तूल विकणारा केजचा रमेश मुंडे यांचा समावेश आहे. तीन दिवसांच्या वाढीव पोलिस कोठडीमुळे आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता मानली जात आहे. या प्रकरणातला मास्टरमाईंड चंदनकुमार मानला जात असला तरी यात आणखी काही क्लास संचालकांचा सहभाग असल्याचे मानले जात आहे. आरोपींना न्यायालयात आणले जाणार याची माहिती असल्याने आजही न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या कक्षात पोलिस आणि वकिलांचीच मोठी गर्दी होती. मागच्या वेळी या आरोपींना जीपमधून आणले होते. यावेळी व्हॅनमधून आणण्यात आले. व्हॅन न्यायालयाबाहेरच लावण्यात आल्या होता.


Comments

Top