HOME   टॉप स्टोरी

मराठ्यांचा लातुरात एल्गार, असा बंद झाला नाही

सगळे शिस्तबद्ध, दिवसभर लातूर बंद ठेवण्याची काळजी, नियोजनबद्ध आंदोलन


लातूर: मराठा अरक्षणासाठी या आधी झालेला मोर्चा अभूतपूर्व होता आणि आज झालेला बंदही त्याच तोडीचा होता. आरक्षणासाठी होणारा हा बंद रात्रीच कळाल्याने सगळ्याच बाजाराने काळजी घेतली. बहुतेकांनी दुकाने उघडलीच नाहीत तर अनेकांनी आवाहनानंत शटर खाली घेतले. या दरम्यान अनेक ठिकाणी काही हिंसक घटना घडल्या. एका पानटपरीत्तलं साहित्य फेकून देण्यात आलं. रिलॅक्स होटेलवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. काही ठिकाणी हातगाडे उधळण्यात आले. शहराच्या चारही बाजुंनी आंदोलक बंद पुकारत निघाले हे नियोजन चांगले होते पण पुढे या नियोजनाला असे धक्के बसत गेले. त्यानंतर काही वेळाने मराठा क्रांती भवनात जाणकार कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाचा पुढचा पवित्रा ठरवला गेला. त्यानंतरही कार्यकर्ते फिरुन फिरुन त्याच ठिकाणी उघडी झालेली दुकाने बंद करीत फिरत होती. या प्रकरणात कुणी माध्यमांसमोर येऊन बोलू नये असा दंडक ठरवला गेल्याने आम्हीही कुणाची नावे घेणार नाहीत. या बातमीसोबतच्या व्हिडीओत जी माणसे दिसतील, ओळखू येतील ते आंदोलनात सहभागी होती असे समजायला हरकत नाही


Comments

Top