logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   टॉप स्टोरी

प्रभाग पाचमधील खत प्रकल्प पथदर्शी अन सर्वोत्तम

नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या प्रयत्नांची उप सचिवांनी घेतली दखल

प्रभाग पाचमधील खत प्रकल्प पथदर्शी अन सर्वोत्तम

लातूर: राज्‍याचे नगर विकास विभागाचे उप सचिव सुधाकर बोबडे यांनी लातूर शहरातील घनकचरा व्‍यवस्‍थापनाचा आढावा घेतला तसेच प्रभाग ०५ मध्‍ये नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्‍या पुढाकारातून उभारण्‍यात आलेला कचर्‍यापासून खत निर्मिती प्रकल्‍पास भेट देवून पाहणी केली. आजवर या प्रकल्‍पात ५२८ टन कचर्‍यावर प्रक्रिया करून ५२ टन खताची निर्मिती केली आहे. राज्‍यातील मनपा क्षेञात विकेंद्रीत पद्धतीने राबविण्‍यात येत असलेला हा सर्वोत्‍तम प्रकल्‍प ठरला आहे. याबाबत उप सचिव सुधाकर बोबडे यांनी समाधान व्‍यक्‍त करून हा पथदर्शी प्रकल्‍प म्हणू सर्वत्र राबविला गेला पाहिजे असे मत व्यक्त केले. नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे व त्‍यांच्‍या सहकार्‍यांचे कौतुक केले. या प्रकल्‍पात निर्मित झालेल्या खताने खुल्‍या बाजारपेठेते विक्रीचा उच्‍चांकही गाठला आहे. यासह त्यांनी टाकाऊ प्‍लास्‍टीक पासून निर्मित रस्‍त्‍याचीही पाहणी केली. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, मनपा अतिरीक्‍त आयुक्‍त सतिश शिवणे, सहायक आयुक्‍त वसुधा फड, नगरसेवक गौरव काथवटे, हमीदपाशा बागवान, सुभाष पंचाक्षरी, समाधान सुर्यवंशी, पी.सी. घंटे, मुनीर शेख, महादेव धावारे, अकबर शेख, आशिष साठे, राजू कुरील, रेवण काडोदे, सुनिता उबाळे, सुर्यकांत काळे उपस्थित होते. राज्यातील मनपा व नगरपरिषदाना १४ व्या वित्त आयोगातून देण्यात येणाऱ्या निधीतून १०% निधी खत निर्मिती प्रकल्पावर खर्च करणे बंधनकारक करावे अशी मागणी विक्रांत गोजमगुंडे यांनी केली. प्रभागातच कचर्‍यापासून खत निर्मिती व्‍हावी यासाठी राज्‍य शासनाने राज्‍यातील सर्व मनपा व नगरपरिषदांना १४ व्या वित्‍त आयोगातून दिला जाणार्‍या निधीमधून १० टक्के निधी प्रभागातच प्रक्रिया प्रकल्‍प उभारण्‍यासाठी वापरणे बंधनकारक करावे अशी सूचना उप सचिव सुधाकर बोबडे यांना केली. त्‍यास त्‍यांनी सकारात्‍मक प्रतिसाद देत शासन स्‍तरावर याबाबत निर्णय घेण्‍यात येईल असे आश्वासन दिले.


Comments

Top