HOME   टॉप स्टोरी

पनाळे खून प्रकरणात दोघांना जन्मठेप

बाकी सहा निर्दोष, व्यंकट पनाळेंना दिलासा, मात्र पुत्र अडकला


लातूर: पुष्कराज ट्रॅव्हल्सचे संचालक युवराज पनाळे यांची २०१२ साली घरासमोरच हत्या झाली होती. यात जवळच्या नातलगांनाच आरोपी ठरवण्यात आले होते. युवराज पनाळे यांच्या मोठ्या वहिनी छाया यांना तेव्हाच बाजुला काढण्यात आले होते. उर्वरीत सातजणांवर खटला चालला. यात संतोष पनाळे आणि मधुकर बस्तापुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिवाय त्यांना २० हजार रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे. या प्रकरणात १८ साक्षीदार तपासण्यात आले. या सुनावणीवेळी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती.


Comments

Top