HOME   टॉप स्टोरी

गीत नया गाता हूं........अटलजींची प्रकृती नाजूक

देशभरात प्रार्थना, अनेक मुख्यमंत्री, बडे नेते दिल्लीकडे, अनेकांची एम्समध्ये धाव


नवी दिल्ली: ज्यांच्या कविता ऐकतच रहाव्यात, ज्यांच्या भाषणात तल्लीनता यायची, सगळ्याच पक्षात लोकप्रियता असणारे अटलजी आज अतिशय नाजूक स्थितीत आहेत. जीवन रक्षक प्रणालीवर त्यांना ठेवण्यात आले आहे. देशभरातील बडे नेते, अनेक मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. एम्स रुग्णालयाबाहेर व्हीआयपी अंब्युलन्स तयार ठेवण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक ठिकाणच्या भाजप कार्यालयांवर करण्यात आलेली सजावट हटवण्यात आहे. वाजपेयींच्या स्वास्थ्यासाठी सर्व धर्मीय आपापल्या पद्धतीने प्रार्थना करीत आहेत. वाजपेयी यांच्यावर ६६ दिवसांपासून उपचार केले जात आहेत. दिल्लीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाजपेयी उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले. या निमित्ताने वाजपेयींची ‘गीत नया गाता हं मै’ ही कविता येथे ऐकवत आहोत. वाजपेयींना भरतरत्न घोषित झाला त्यावेळच्या या कविता आहेत. इंडीया टीव्हीच्या सौजन्याने ही चित्रफित दाखवित आहोत.


Comments

Top