HOME   टॉप स्टोरी

देता की जाता? धनगर समाजही पेटला!

जिल्हाधिकारी कार्यालावर राज्यभर ढोल जागर गोंधळ


लातूर: भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार राज्यातील धनगर समाजाचा अनुसुचित जमातीच्या प्रवर्गात समावेश आहे असे असताना ही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासनाने त्वरीत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करुन आरक्षणाचा लाभ द्यावा या मागणीसाठी २७ ऑगस्ट रोजी धनगर समाजाच्यावतीने राज्यभर जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन करण्यात येणार आहे.या संदर्भात जय मल्हार सेनेच्यावतीने आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेर सांगण्यात आले आहे. विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्याबरोबर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे अश्वासन दिलेले होते. पण हा प्रश्न सोडवण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. धनगर समाज आरक्षण संघर्ष समितीच्यावतीने २७ ऑगस्ट रोजी राज्यभर आंदोलन करण्याचे निश्चीत करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालयांसमोर २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता धनगरी सांस्कृतिक पध्दतीने ढोल जागर आंदोलन करण्यात येणार आहे. लातूरातील तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. यावेळी गणेश हाके, लहुजी शेवाळ, सुरेश भुमरे, अ‍ॅड. माधव कोळगावे, हरीभाऊ काळे, ज्योती भाकरे, गौरव मदने, राम माने, ओमप्रकाश नंदगावे, माधव साळुंके उपस्थित होते.


Comments

Top