HOME   टॉप स्टोरी

प्राध्यापकाकडून विनयभंग, पोलिस मलाच बोलावून घेतात- पिडीत

लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार, प्रकरण महिला तक्रार निवारण समितीकडे


लातूर: लातुरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीचा दीडेक वर्षापासून प्राध्यापकाकडून छळ सुरु असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित प्राध्यापकावर कारवाई करण्याऐवजी पोलिस आपल्यालाच वारंवार बोलावून घेतात असे या विद्यार्थीनीचे म्हणणे आहे. परप्रांतातून लातुरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेली ही विद्यार्थीनी पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. याच महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. गिरीश ठाकूर सातत्याने त्रास देतात, अश्लील बोलतात, सोबत मुंबईला चल म्हणतात, सांगता येत अशी मागणी करतात. या पूर्वीही या प्रकरणी आपण तक्रार दिली होती पण त्याला दाद मिळाली नाही असं ही तरुणी सांगते. या प्रकरणाबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण ते रजेवर असल्याचे समजले. त्यांचा पदभार तुर्तास डॉ. श्रीकांत गोरे यांच्याकडे आहे. डॉ. गोरे यांनाही या प्रकरणाची माहिती वर्तमानपत्रातूनच मिळाली. हे प्रकरण चौकशीसाठी महिला तक्रार निवारण समितीकडे देण्यात आले आहे. याची प्राथमिक चौकशी करुन २४ तासात त्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण संचालकांना देण्यात येईल अशी माहिती डॉ. गोरे यांनी दिली. या प्रकरणी लातुरच्या गांधी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.


Comments

Top