HOME   टॉप स्टोरी

केमिस्टांचा बंद, मूक मोर्चा, ऑनलाईनला विरोध

ऑनलाईन औषध विक्रीमुळे कुणालाही मिळतील कोणतीही औषधे


लातूर: आज केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघट्नेच्या वतीने देशव्यापी २४ तासाचा बंद पुकारण्यात आला. लातूर शहरात आज केमिस्ट व्यापार्‍यांनी गोलाई ते जुने जिल्हाधिकारी कार्यालायापर्यंत पायी मुक मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात लातूरमधील व आजूबाजुच्या गावातील व्यापार्‍यांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवला आहे. ऑनलाइन फार्मसीला केंद्र सरकार देत असलेल्या प्रोत्साहनाच्या निषेधार्थ औषधविक्रेत्यांनी एक दिवसाचा देशव्यापी बंद पुकारला. केमिस्टच्या संपामुळं त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अन्न व औषध प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मसिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन या बंदमध्ये सहभागी झाली आहे. ऑनलाईन औषधांची विक्रीस सुरवात केल्यास काही धोकादायक औषधे सहज लोकांना मिळतील आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम वाईट होणार आहे. यामुळे ऑनलाईन विक्रीस या व्यापार्‍यांचा विरोध आहे. झोपेच्या गोळ्या, गर्भपाताच्या गोळ्या ऑनलाईनमुळे सहज चुकींच्या लोकांना मिळतील. त्यातून समाजात धोका निर्माण होऊ शकतो यामुळे यावर निर्बंध आणावा आणि सरकारने हा निर्णयास स्थगिती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Comments

Top