logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

कसेतरी काढलेले सोयाबीन दिले अज्ञातांनी पेटवून

आस्मानी आणि सुलतानी संकटातून सुटलेल्या शेतकर्‍यांना हितशत्रू जगू देईनात

लातूर: लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत कसंबसं पीक काढून शेतकर्‍यांनी रचलेली सोयाबीनची गंजच पेटवून देण्याचा प्रताप पानचिंचोली गावात घडलाय.
पानचिंचोलीत ऋषी होळीकर या तरुण शेतकर्‍याने तीन एकरमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. फलधारणा होऊन पीक परिपक्व होईपर्यंत त्यांनी प्रतिक्षा केली. पण मळणी यंत्र न मिळाल्याने त्यांनी या सोयाबीनची गंज रचून ठेवली होती. मळणी यंत्र दोन दिवसांनी मिळायचे होते. काल दसरा असल्याने सगळेजण गावात होते. ही संधी साधून अज्ञातांनी ही गंज पेटवून दिली. ही गंज तशीच राहिली असती तर किमान ३० क्विंटल सोयाबीन निघाले असते. त्यातून या शेतकर्‍य़ास एक ते दीड लाख रुपये मिळाले असते. एकीकडून आस्मानी संकट मारते, दुसरीकडून सुलतानी संकट हातात तलवार घेऊन तयारच असते, आता गावातलेच शत्रू आपल्या विकृत समाधानासाठी असे प्रयत्न करीत आहेत.
या प्रकरणी तलाठ्याचा पंचनामा झाला असून आता पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.


Comments

Top