HOME   टॉप स्टोरी

लातूर जिल्ह्यात माहे जून २०१९ पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही

संभाजी पाटील यांच दावा, पाणी टंचाईची काळजी करु नये


लातूर जिल्ह्यात माहे जून २०१९ पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही

लातूर: सन २०१५-१६ पूर्वीच्या दोन-तीन वर्षात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मांजरा प्रकल्पातील पाणी साठा शून्य होऊन धरण कोरडे पडले होते. त्यामुळे सन २०१५-१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते. परंतु सध्याच्या परिस्थिती मध्ये मांजरा प्रकल्पात ४५ दश लक्ष घन मीटर इतका पाणी साठा उपलब्ध असल्याने लातूर शहराला जून २०१९ पर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा होईल. त्याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर पाणी प्रकल्पातील पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून लातूर शहरासह जिल्ह्याला
जून २०१९ पर्यंत पाणी टंचाई भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाणीटंचाईची काळजी करू नये, असे आवाहन राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रब्बी हंगाम कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. यावेळी खासदार सुनील गायकवाड, आमदार त्र्यंबक भिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता क्षिरसागर, कार्यकारी अभियंता श्रीमती. रुपाली ठोंबरे, महानगर पालिकेचे
उपआयुक्त संभाजी वाघमारे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री जनार्धन विधाते, रामेश्वर रोडगे, अरविंद लोखंडे, विकास माने, बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी (सा.) संतोष राऊत यांच्या सह इतर यंत्रणा प्रमुख व समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.


Comments

Top