logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

सहा हजार बेरोजगारांना मिळणार नोकरी- विनोद खटके

नोकरी मेळावा घेणे सरकारचे काम- अमित देशमुख

सहा हजार बेरोजगारांना मिळणार नोकरी- विनोद खटके

लातूर: सुशिक्षित युवक व युवतींच्या हाताला काम देण्यासाठी व्ही. एस. पॅंथर्सच्या वतीने आज नोकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात राज्यातील २६ कंपन्यांचे प्रतिनिधी आले आहेत. यामध्ये सर्वच प्रकारच्या नोकर्‍या देण्यासाठी सर्व प्रकारचे विद्यार्थी आले होते. लातूर जिल्ह्यातील नवयुवकांना जिल्ह्यातुन बाहेर गेल्यानंतर होणारे हाल पाहून आजचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे खटके म्हणाले. दररोज जिल्ह्यातून शेकडो विद्यार्थांचे स्थलांतर होताना दिसत आहे यावरती काही तरी उपाय करण्याचे काम शासनाचे असताना देखील ते काम व्ही. एस. पॅंथर्स संघटनेला करावे लागते आहे याचे वाईट वाटत असल्याचे अमित देशमुख म्हणाले. देशातील विद्यमान सरकारने निवडून आल्यानंतर देशात २ कोटी रोजागार निर्मीतीचे खोटे आश्वासन दिले होते ते आता फोल ठरले आहे. या प्रकारचे मेळावे राज्यात घेतले जावेत यामधून बेरोजगारांच्या संख्येत घट होण्यास मदत होईल. यावेळी आमदार अमित देशमुख, आ. बस्वराज पाटील, विनोद मुळे, मोईज शेख, अ‍ॅड. हिप्परकर, समद पटेल, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, सचिन मस्के, सचिन बंडापल्ले, दिपक सुळ, नगरसेविका कांचन अजनीकर, दिप्ती खंडागळे, व्यंकटेश पुरी, आनंद जाधव, अमोल सुरवसे, किरण पायाळ, असद शेख, निलेश कांबळे व हजारो विद्यार्थी उपस्थित होते. या निकर भरती मेळाव्यातून आपणास चांगली संधी मिळे अशी अपेक्षा गौरी चिंचाळकर या विद्यार्थीनीने व्य्क्त केली.


Comments

Top