HOME   टॉप स्टोरी

शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्‍ती म्हणून जाहीर करावे

- माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर


शेतकरी आत्महत्या राष्ट्रीय आपत्‍ती म्हणून जाहीर करावे

लातूर: सध्या मराठवाड्यात भिष दुष्काळ परिस्थिती, आवर्षणग्रस्त स्थिती व सततची नापीकी निर्माण झालेली असून या संकटामुळे तमाम शेतकरी वर्ग तसेच ग्रामीण भागातील सामान्य माणूस आर्थिक अडचणीत विवंचनेत सापडून आत्महत्येचा मार्ग स्विकारत आहे. देशात मागच्या चार वर्षात हजारो शेतकर्‍यांनी व लातूर जिल्ह्यात १७० शेतकर्‍यांनी आपले जीवन संपविले आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून केंद्र व राज्य शासनाने शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करावे व त्यांच्या पुर्नवसनासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी आग्रही मागणी आपण केले असल्याचे प्रतिपादन लोकनेते माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी जनसंवाद यात्रेनिमित्त गाधवड, मसला, पिंपरी अंबा येथे आयोजित केलेल्या शेतकर्‍यांच्या संवाद बैठकीत बोलताना केले.
यावेळी अध्यक्षपदी गावचे गुरूलिंग भुजबळ, प्रमुख उपस्थितीत शिवराम कदम, जननायक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब देशमुख, कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, तालुकाध्यक्ष माधवराव गायकवाड, कार्याध्यक्ष नरसिंग इंगळे, चिटणीस राजाभाऊ मुळे, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कार्याध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा युवा अध्यक्ष प्रा.मारोती सुर्यवंशी, श्रीकांत झाडके आदीसह गाधवडचे रंगनाथ भिसे, पंडीतराव जाधव, शरद पाटील, पिपंरी अंबा येथील जेष्ठ नागरिक किसनराव भिसे, चेअरमन तात्यासाहेब भिसे, जयचंद भिसे, कोंडीराम भिसे, उत्‍तम आदमाने तसेच मसला येथील बैठकीसाठी नरसिंग वांगसकर, चेअरमन चंद्रकांत वांगसकर, उपसरपंच हानमंत राजमाने, तंटामुक्‍ती अध्यक्ष सुभाष पाटील, बसलिंग बिडवे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना लोकनेते कव्हेकर म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी नैसर्गिक व सरकारची अवकृपा या अडचणीत सापडला आहे. सरकारने हमीभाव जाहीर केला, पंरतु त्याची योग्य अमलबजावणी होत नाही. माल खरेदीसाठी ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या २० टक्के शेतकर्‍यांनाच त्याचा लाभ झाला. त्यात ८० टक्के शेतकर्‍यांचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत,अ शांना सरकारने पत्येकी एक हजाराचे अनुदान जाहीर केले ते पण मिळाले नाहीत. यावर ठोस तोडगा काढण्यासाठी मध्यप्रदेश, हरियाना या राज्य सरकारप्रमाणे महाराष्ट्र शासनाने भावांतर योजना लागू करून हमी भावाचा प्रत्यक्ष लाभ देण्याची खरी गरज आहे, तरच या शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर मात करता येते. त्याचबरोबर या तमाम भिषण दुष्काळाची व्यथा कायदे करणार्‍या लोकसभा व विधानसभा सभागृहात प्रश्‍न पोटतिडकीने व प्रभावीपणे मांडणार्‍या प्रभावी, लढवय्ये लोकप्रतिनिधीची गरज आहे, पंरतु तसे घडत नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येत अधिक वाढ होत आहे.
मराठवाड्याची दुष्काळ परिस्थिती कायमची दूर करण्यासाठी गोदावरी खोरे, कृष्णा खोर्‍यातून २३ टी.एम.सी. पाणी मिळण्यासाठी मोठा लढा उभारण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यावे, आपण शेतकरी प्रश्‍नासाठी जिवाचे रान करून कार्यरत राहू, असे नमुद करून आपल्या आमदारकीच्या काळात भूकंप झालेल्या गावातील जनतेला अनुदान मिळवून देण्यासाठी एक लाख जनतेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला व आपण त्यावेळेस विधानसभा बंद पाडून हा विषय सभागृहात लावून घरला, त्यामुळे २५ हजार कुंटूबांना ३५ हजार रूपयाचे रोख अनुदान मिळवून दिले. याची आठवणही त्यांनी नमुद केली. व आपण शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी धावून येवू, असा आत्मविश्‍वास शेवटी बोलताना दिला.


Comments

Top