HOME   टॉप स्टोरी

लातूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या सर्रास शिकारी

वनखाते काळजी तर नाहीच नाही पण दखलही घेत नाही


लातूर: लातूरसह सबंध राज्यात वन्यजिवांची तस्करी, त्यांना कापणे, मांसाची विक्री अरणे सर्रास सुरु आहे. काही वर्षा पूर्वी बार्शी रोडला असाच प्रकार घडला होता. एक काळवीट कापून त्याच्यावर अनेकांनी ताव मारला आणि थाटात त्या काळविटाचे मुंडके झाडाला लटकावण्यात आले होते. अलीकडे लातुरच्या जनावराच्या बाजारात वन्यप्राणी सर्रास विकले जातात. त्यावरही कुणाचा अंकुश नाही. वन अधिकारी त्याची दखल घेत नाहीत. दादही घेत नाहीत. या अधिकार्‍यांवर कुणाचा अंकुशही नाही. वन्यप्राण्यांना जंगलात सोडण्यासाठी सहकार्यही करीत नाहीत असा आरोप भिमाशंकर गाढवे आणि शाम सुरवसे यांनी केला आहे.
निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आरक्षित वनक्षेत्र आहे, तिथे हरीण, मोर, काळवीट, ससे, रानडुक्कर, सायळ असे जंगली वन्यजीव खूप प्रमाणात आहेत पण या वन्य जिवांची तिथे हत्या केली जात आहे असा कयास आहे आणि या घटनेकडे वन खाते डोळेझाक करत आहे, मी ज्या वेळी तिथे सापांना निसर्गात सोडण्यासाठी गेलो होतो त्यावेळी मला एक काळवीट अश्या अवस्थेत तिथे आढळून आले, तिथे काळवीटाची शिकार करून पार्टी पण तिथेच झाली असावी असे दृश्य होते. असे भिमाशंकर गाढवे यांनी सांगितले.


Comments

Top