HOME   टॉप स्टोरी

संतोष देवडेंनी परत केले एटीएम मधून आलेले दुसर्‍याचे दहा हजार रुपये

लातूर जिल्हा पोलिस अधिक्षकांकडून सत्कार आणि प्रमाणपत्र


लातूर: बॅंक ऑफ इंडियाच्या उषाकिरण एटीएम मधून एका व्यक्तीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण पैसे आलेच नाहीत. या ठिकाणी पोलिस नाईक संतोष देवडेही आले. दरम्यान त्या आधीच दहा हजार रुपये एटीएम मधून बाहेर आले. ही बाब तेथे उपस्थित असलेल्या ओंकार रांजवण यांनी देवडे यांच्या कानी घातली. ज्या व्यक्तीने दहा हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता त्याची रात्री बारा वाजेपर्यंत प्रतिक्षा केली पण ती व्यक्ती परत आलीच नाही. दुसर्‍या दिवशी देवडे यांनी बॅंकेशी संपर्क साधला. कालच्या एटीएमचे व्यवहार तपासले तेव्हा त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर मिळाला ते दहा हजार रुपये देवडे यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकाकडे सुपूर्त केले. या घटनेची सगळी माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॊ. राजेंद्र माने यांनी पोलिस नाईक संतोष देवडे आणि ओंकार रांजवण यांचा सत्कार केला, प्रमाणपत्रही प्रदान केले. यावेळी बॅंक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी भास्कर मोरेही उपस्थित होते.


Comments

Top