HOME   टॉप स्टोरी

लातुरकर झकास, गंजगोलाई मात्र उदास

गोलाईचा १०० वा वाढदिवस साजरा करण्याकडे सगळ्यांचेच दूर्लक्ष


लातूर: निजामाने आखून दिलेल्या गोलाईला लातुरकरांनी आकार दिला. या वास्तुने आजवर कोट्यवधी ग्राहकांना सेवा दिली. या गोलाईला आता १०२ वर्षे पूर्ण होत आहेत. शहराचं नाक आणि भूषण मानल्या जाणार्‍या या गोलाईची साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही. शताब्दी पूर्तीनिमित्त गोलाईचं सुशोभिकरण आणि आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन व्हायला हवं होतं पण तेही झालं नाही. मनपा आणि प्रशासन या दोघांनाही याची खंत नाही. आज सबंध लातुरात दिवे उजळताहेत, फटाके फुटताहेत. आनंद साजरा केला जात आहे. पण १०० वर्षातल्या सगळ्या घटना झेललेल्या, सगळया घटनांची साक्षीदार असलेल्या गोलाईकडे मात्र कुणी पहायला तयार नाही.


Comments

Top