HOME   टॉप स्टोरी

या फौजांचं करायचं काय? श्वानशाळा काढावी का?

प्रशिक्षण देऊन सीमेवर पाठवायचं का?


लातूर: लातूर शहरातील भटक्या जनावरांची गोशाळात रवानगी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात होता. त्यानुसार त्यांचा प्रश्न मिटेल पण शहरातील भटक्या कुत्र्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न आहे. कायद्याने त्यांना मारता येत नाही, निर्बिजीकरणही करता येत नाही. यामुळे नवी कोंडी निर्माण झाली आहे. लातूर शहरातील बार्शी रोडचा काही भाग आणि औसामार्गावरील काही भाग सोडला तर शहरातील अनेक गल्ल्या, प्रभागात सकाळी आणि रात्री या भटक्या कुत्र्यांचे कळप फिरत असतात. अलिकडे त्यांची संख्य़ा खूप वाढल्याने चाव्यांचे प्रमाण वाढले आहे. मित्रनगर, खोरी गल्ली, सावेवाडी, दयाराम रोड, तेली गल्ली, हमाल गल्ली, बालाजी मंदीर, सूळ गल्ली, पटेल चौक, सिद्धेश्वर चौक, साळे गल्ली, रत्नापूर चौक, विवेकानंद चौकाचा परिसर, सम्राट चौक अशा गावभागात तर या फौजांनी मोठा उच्छाद मांडला आहे.
पूर्वी कुत्रा चावला की १४ इंजेक्शन्स घ्यावी लागायची. नंतर तीन घ्यावी लागतात. ही इंजेक्शन्स सरकारी दवाखान्यात बर्‍याचदा मिळत नाहीत. ती बाहेरुन आणावी लागतात. तीन इंजेक्शन्स १२०० रुपयात उपलब्ध होतात. ज्या पद्धतीने भटक्या जनावरांसाठी गोशाळा हा पर्याय निवडला गेला. अशाच पध्दतीने श्वानशाळाही उभाराव्यात. गोशाळेतील जनावरे किमान शेण तरी देतात. मग श्वानशाळातून काय मिळणार? या श्वानांना प्रशिक्षण देऊन त्यांना सिमेवर लढणार्‍या भारतीय जवानांच्या मदतीसाठी पाठवता येईल!


Comments

Top