HOME   टॉप स्टोरी

अल्पभूधारक शेतकर्‍याचा मुलगा बनला उद्योगपती

नोकरीच्या शोधात गेला अन नोकरी देणारा बनला!


लातूर: घरची परिस्थिती हलाखीची असल्याने दोन वेळच्या पोटाची खळ्गी भरण्यासाठी नोकरीच्या शोधात पुणे येथे गेलेला निलंगा तालुक्यातील हाड्गा येथील अल्पभूधारक शेतकर्‍याचा मुलगा जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज पुणे येथे नामांकित उद्योगपती बनला आहे.
निलंगा तालुक्यातील हाड्गा येथील अल्पभूधारक शेतकर्‍याच्या घरी जन्मलेले मदन वाघमारे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. रोजंदारीच्या कामावर कुटुंबांचा गाडा चालत असे. निलंगा येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात वेल्डरचा कोर्स पूर्ण करुन अंगावरच्या एका ड्रेसवर नोकरीच्या शोधात पुणे गाठले. टेल्को कंपनीत वेल्डर मणून नोकरी मिळविली. नोकरी करत करत जमा केलेल्या पैशातून एक चारचाकी गाडी घेउन एक ड्रायव्हर ठेवून कंपनीतील कामगार सोडण्याचे काम सुरु केले. त्यात त्यांचा जम बसत गेला. मिळणार्‍या नफ़्यातून आणि नोकरीच्या पैशांतून त्यांनी त्या व्यवसायाची व्याप्ती वाढवित एक एक करीत गाड्या वाढविल्या. आज रोजी जवळपास १०० मोठ्या गाड्या व २०० कामगार असा त्यांचा स्टाफ़ आहे. नोकरीच्या शोधात गेला अन नोकरी देणारा बनला आशी त्यांची ओळख झाली. पुणे येथे आज मोठा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उद्योगाबरोबरच समाजसेवेचा वसा त्यांनी घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अहमदनगर, पुणे, मुबंई, सातारा, लातूर येथे ‘उत्कृष्ट उद्योजक’ म्हणून त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. नुकतेच दिल्ली येथे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या हस्ते त्यांना इंटरनॅशनल अ‍ॅचिव्हर्स अ‍ॅवॉर्ड देवून गौरविण्यात आले.


Comments

Top