HOME   टॉप स्टोरी

राफेल घोटाळ्याची चौकशी जेपीसीमार्फत करा

लातुरच्या तहसील कार्यालयासमोर कॉंग्रेसजनांचे धरणे आंदोलन


लातूर: राफेल विमान खरेदी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत कराअयला हवी, मात्र हे सरकार चौकशीपासून पळ काढतंय असा आरोप करीत आतूर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांनी केले. कॉंग्रेसचे सर्व स्थानिक नेते, कार्यकर्ते यांनी जेपीसीद्वारे चौकशी करण्याच्या मागणीसाठी लातुरच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करुन न्यायालयीन चौकशीची गरज नाही असे सांगत क्लीन चिट मिळाल्याचा करायचा, घोटाळ्यावर पांघरुण घालण्यासाठी राष्ट्रवादाचं भूत उभा करायचं. संरक्षणांचं नाव पुढे करायचं. या विमानांना राफेल विमान म्हणायचं की अंबानी विमान म्हणायचं असा प्रश्न पडला आहे. सुरुवातीपासूनच कॉंग्रेसने संयुक्त संसदीय समितीमार्फ चौकशी करण्याची मागणी केली होती. या समितीत सगळ्याच पक्षाचे सदस्य असतात. किमतीचा घोटाळा समोर येऊ नये, अंबानीसारख्यांच्या घरात ३६ हजार कोटी रुपये पाठवायचे आणि निवडणुका जिंकायच्या हा प्रकार उघड करण्यासाठी, जनतेत जागृती करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असेही अ‍ॅड. व्यंकट बेद्रे म्हणाले.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, बी.व्ही. मोतीपवळे, एस. आर. देशमुख, समद पटेल, पृथ्वीराज शिरसाट, कैलास कांबळे, व्यंकटेश पूरी, संतोष देशमुख, सुपर्ण जगताप, हरीराम कुलकर्णी, सपना किसवे, प्रा. स्मिीता खानापूरे, सुनिताताई आरळीकर, शितल फुटाणे, प्रवीण घोटाळे, शिवाजीराव जवळगेकर, खुशालराव सुर्यवंशी, एम. पी. देशमुख, सपना किसवे, प्रा. स्मिीता खानापूरे, सुनिताताई आरळीकर, केशरबाई महापूरे, सुलेखा कार्यपुरकर, लक्ष्मीताई बटनपूरकर, राजकुमार पाटील, सुदाम रुकमे, अलताफ शेख, बालाजी सोळूंखे, सिकंदर पटेल, ॲङ प्रदिप गंगणे, ॲङ दिनेश रायकोडे, ॲङ सुहास बेद्रे, राहूल डूमणे, ॲङ देविदास बोरूळे पाटील, बिभीषण सांगवीकर, सागर मुसांडे, अनंत वैरागे, प्रविण सुर्यवंशी, नरेश पवार, राज क्षिरसागर, ॲङ किशन शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


Comments

Top