logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   टॉप स्टोरी

Updated....चलबुर्गा पाटीजवळ पुन्हा अपघात ०३ जण ठार, ०७ जखमी

१०८ क्रमांकावर डायल, रुग्णवाहिका तातडीने आली, २५ मिनिटात जखमी लातुरात

नितीन भाले, लातूर: हैद्राबादकडे जाणारी बस आणि समोरून येणारा ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत तीनजणांचा बळी गेला तर सातजण जखमी झाले. रात्री बाराच्या सुमारास औसा लामजना मार्गावर चलबुर्गा पाटी आणि वाघोली पाटी यांच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. याच मार्गावर १५ दिवसातला हा तिसरा अपघात आहे. हा मार्ग-हे ठिकाण जंपिंग रोड म्हणून कुप्रसिद्ध आहे. ही घटना समजताच किल्लारी पोलिस दाखल झाले. या मार्गावरुन जाणारे इश्वर पाटील यांनी जखमींना आपल्या वाहनातून निलंगा येथे आणले. लातूर हैद्राबाद या बसची गती ४०-४५ ची होती. समोरुन आलेला ट्रक वेगात होता. बसच्या उजव्या बाजुला धडकला. त्याने बस मधून फाडली अशी माहिती अपघातग्रस्त ओमप्रकाश पाटील यांनी दिली. यावेळी १०८ क्रमांकावर अपघाताची माहिती देताच रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. यामधून २० ते २५ मिनिटात लातूर गाठण्यात आले. जखमींना तातडीने मदत मिळाली.
मृतात सोनल अमित भोज निलंगा, आयशा इस्माईल बागवान हैदराबाद आणि बापुसाहेब बिडवे कळंब यांचा समावेश आहे. जखमींमध्ये अमित रामकृष्ण भोज निलंगा, मोहम्मद इस्माईल बागवान हैदराबाद, सोनू किसन काळे ढोकी, ओमप्रकाश जगन्नाथ पाटील यल्लोरी ता. औसा, सुनील सतीश शिंदे ढोकी, किशोर गोरख डोंगरे उदगीर आणि अनिस मन्सूर शेख लातूर यांचा समावेश आहे. या अपघात प्रवण क्षेत्रातील हा रस्ता-ठिकाण जंपिंग रोड म्हणून कुप्रसिद्ध आहे.


Comments

Top