HOME   टॉप स्टोरी

लातुरचा प्रेक्षक सुजाण, प्रगल्भ आणि दाद देणारा- केतकी माटेगावकर

कलेला धर्म नसतो! केतकीनं केल्या ‘आजलातूर’शी मनमोकळ्या गप्पा


लातूर: नव्या पिढीतली नव्या दमाची गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर आज लातूर भेटीवर आल्या. एखाद्या कलावंताला चांगला ब्रेक मिळाला की त्याला बॉलीवूडचे वेध लागतात, निमंत्रणंही येतात. पण केतकींनी तसं केलं नाही. कला कला आहे. कलेला प्रांत नसतो, धर्म नसतो. कुठल्याही कलेची सेवाच करायची. केतकीच्या बोलण्यात कमालीची निरागसता, मोकळेपणा आणि तितकाच प्रगल्भपणाही दिसला. केतकी लातुरात दुसर्‍यांदा आल्यात. आठ वर्षांपूर्वी त्यांनी लातुरात गाणं सादर केलं होतं. टाईमपासनंतर त्या पहिल्यांदा लातुरात आल्या. लातुरचा प्रेक्षक सुजाण आणि दर्दी आहे. लातुरातही खूप चांगलं टॅलेंट आहे. लातुरातील अनेक गायक माझे मित्र आहेत. पुन्हा एकदा लातुरात आले याचा मला खूप आनंद वाटतो. मराठीतल्या सगळ्यांनीच बॉलीवूड मध्ये जावं किंवा जाऊच नये असं काही नाही. कला हा एकच धर्म आहे. मी कुठल्याही क्षेत्रात काम करु शकते. कुठल्याही भाषेत काम केलं तरी मी मराठीलाच प्रेझेंट करेन त्यांना प्राधान्य देईन. मराठी इंडस्ट्रीला खूप चांगले दिवस आले आहेत. भविष्यातही येतील. मराठी इंडस्ट्रीला चांगली ओळख मिळाली तेव्हाच मी या इंडस्ट्रीत आले. भविष्यात ही इंडस्ट्री आणखी सक्षम होईल. परदेशातही मराठीला खूप मान मिळतो. जेव्हा मी वेगवेगळ्या ठिकाणी जाते तेव्हा लोक संवादही बोलायला लावतात, गाणंही म्हणायला लावतात आणि मी ते करते.


Comments

Top