HOME   टॉप स्टोरी

१३ वर्षीय ‘विद्यार्थ्या’वर बलात्कार, रेल्वे स्टेशन मार्गावरचा प्रकार

आरोपी राम बालाजी वाघमारेला अटक, पिडीतावर सरकारी दवाखान्यात उपचार


लातूर: अठवीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उजेडात आली आहे. हा उद्वेजनक प्रकार करणार्‍या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करण्यात आली आहे. अतिशय गरीब कुटुंबातील या मुलाला नीटपणे उपचार मिळत नसल्याची तक्रार त्याच्या आई वडिलांनी केली आहे. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
हा प्रकार कालचा आहे. एक आठवीत शिकणारा मुलगा मोठ्या भावशी भांडण झाल्याने रुसून लातुरच्या बस स्थानकात येऊन बसला. तेथे त्याला राम बालाजी वाघमारे याने हेरले. गोड बोलून फूस लावून त्याला रिक्षात बसवले. लातूर रेल्वे स्थानकाच्या रस्त्यावर त्याला नेले. तेथे त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराने वेदनाग्रस्त होऊन, गलीतगात्र होऊन हा पिडीत मुलगा बसलेला असताना आई वडिलांना सापडला. त्याचवेळी गस्त घालणारे पोलिस आले. त्यांनी त्याची चौकशी केली. त्याने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. या मुलाने सांगितलेल्या माहितीवरुन पोलिसांनी राम बालाजी वाघमारेला ताब्यात घेतले. पिडीत मुलगा अजून त्याच दवाखान्यात असून त्याला अधिक उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्याची गरज असल्याचे त्याच्या नातलगांनी सांगितले. या प्रकरणी ३७७ बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी विनंती खंडू शिरसाट यांनी केली आहे.


Comments

Top