HOME   टॉप स्टोरी

१०२ गावांचा दौरा करुन शिवाजीराव कव्हेकरांनी काढला ‘जननायक’ मोर्चा

१५ संघटनांचा पाठिंबा, वीज तोडणार्‍यांना फोडून काढा, उर्जामंत्र्यांवर दाखल करु देशद्रोहाचा खटला


लातूर: १०२ गावांचा दौरा करुन आज माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांनी मोर्चा काढला. ग्रामीण भागातील चित्र विदारक आहे, प्रचंड समस्या आहेत, शहरी भागातही अनंत अडचणी आहेत पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही, सरकारचं लक्ष वेधण्यासाठीच आज मोर्चा काढला अशी माहिती शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिली. २० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या काळात कव्हेकरांनी लातूर आणि रेणापूर तालुक्यातील १०२ गावातून ग्रामस्थांच्या बैठका घेतल्या. या बैठकातून प्रश्न समजाऊन घेतले. प्रकर्षाने शेतकर्‍यांच्या समस्या अधिक जाणवल्या. आज पाणी असूनही महावितरणच्या धोरणांमुळे शेतीला पाणी देता येत नाही याबाबतचं निवेदनही महावितरणला दिलं.
मार्केट यार्डातून निघालेल्या आजच्या या मोर्चाला १५ संघटनांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्र जनरल कामगार संघटना, शेतकरी संघटना आणि निराधार संघटना यांचा त्यात समावेश होता. शेतकर्‍यांचं कर्ज सरसकट माफ करावं, सोयाबीनला मिळणारा सरकारी भाव आणि बाजारातला भाव यातला फरक सरकारने द्यावा, ग्रामीण भागतील विजेचा प्रश्न सोडवावा, दुष्काळातली वीज बिले माफ करावीत, लातूर शहरात अव्वाच्या सव्वा मालमत्ता कर आकारला जातो तो कमी करावा, मांजरा धरणात पाणी असूनही नियमितपणे मिळत नाही त्याची व्यवस्था करावी. शाळा, महाविद्यालयंचे नुदान द्यावे अशा मागण्या कव्हेकर यांनी केल्या. जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेल्या या मोर्चाचे रुपांतर सभे झाले. यावेळी कामगार नेते सय्यद साजीदभाई, बाबासाहेब कोरे, राजकुमार होळीकर, शैलेश पाटील चाकूरकर, राजकुमार सस्तापुरे, केशरबाई महापुरे मंचावर उपस्थित होते. या सभेत कव्हेकर, सय्यद साजीदभाई, बाबासाहेब कोरे यांची भाषणे झाली. सभेनंतर जिल्हाधिकार्‍य़ांना निवेदन देण्य़ात आले.


Comments

Top