HOME   टॉप स्टोरी

अवयवदानाची बॅंक, लातूर शिक्षणाची खाण, त्याचा विकास करणार

‘माझं लातूर माझं व्हिजन’मध्ये पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर


लातूर: किरण लोभेच्या माध्यमातून लातुरात अवयवदानाची सुरुवात झाली. त्याची दखल घेत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी स्वत:च अवयवदानाची घोषणा खेली. इतकंच नव्हे तर त्यांनी अन्य कार्यकर्त्यांचे अर्जही भरुन घेतले. जशी ब्लड बॅंक असते त्याचप्रमाणे अवयवदानाची बॅंक उभारण्याचा संकल्प त्यांनी केला. आधी आपण करायचे आणि मगच इतरांना सांगण्याचे हा बाणा त्यांनी अंगिकारला. अवयवदानातून देशभरातील कुणाचेही प्राण वाचले तरी त्याला महत्व आहे असं संभाजीराव म्हणतात. आजलातूर-नेटवाणीच्या ‘माझं लातूर-माझं व्हिजन’ या विशेष संवाद मालिकेत ते बोलत होते. विकास म्हणजे मोठ्या इमारती बांधणे याला विकास म्हणत नाहीत. चांगले रस्ते म्हणजे विकास नाही. इतर राज्यात कोळसा, तेलाच्या खाणी आहेत. त्यावर त्या राज्यांचा विकास होतो. लातुरमध्ये शिक्षणाची खाण आहे. या खाणीचा विकास केला तर जगभरातील विद्यार्थी येथे येतील. याला आपण चालना देऊ, पुण्याचा विकासही शिक्षणामुळेच झाला. लातूर शिक्षणाची खाण आहे. त्याला चालना दिली पाहिजे असेही संभाजीराव पाटील म्हणतात.


Comments

Top