HOME   टॉप स्टोरी

थर्टी फर्स्टच्या रात्री कारने दिली विजेच्या खांबाला धडक, लाईट गुल

धडक देणारी कार क्लासचालकाची, चालकाच्या हाताला दुखापत


लातूर: नववर्षाच्या आगमनाला म्हणजे मध्यरात्री एका कारने विजेच्या खांबाला जबर धडक दिली. या धडकेमुळे विजेचा खांब वाकला, वीज प्रवाह बंद झाला. हा प्रकार राजस्थान शाळेजवळ बंकटलाल शाळेच्या समोर घडला. वीज प्रवाह एक वाजेपर्यंत बंद होता. महावितरणचे कर्मचारी सकाळपासून झट होते. ही कार आपल्या लातूरच्या क्लासेस गल्लीतल्या आर. के. मिश्रा यांची होती. मिश्रा यांचे एमकेटी क्लासेस नावाने खाजगी शिकवणी चालते.
या कारचा समोरचा भाग उडून पन्नास फुटांवर पडला होता. कार दोन्ही बाजुंनी घासली गेली आहे. एवढेच नव्हे तर या कारचे एक टायरही फुटले आहे. या बातनीचं चित्रीकरण करताना मिश्राही होते आणि कारचालकही होता. पण दोघांनी कॅमेर्‍यासमोर बोलण्यास नकार दिला. कारचालकाच्या हाताला जखम झाली आहे. यूपी ३२ ईआर ७७२५ असा या कारचा क्रमांक आहे. नेमप्लेटवर भाजपाचे चिन्ह आहे.


Comments

Top