HOME   टॉप स्टोरी

भिमा-कोरेगाव प्रकरणाचे पडसाद, दोन बसेस फोडल्या

इतर अनेक वाहनांचे नुकसान, पोलिसांनी केला सौम्य लाठीमार, स्थिती नियंत्रणात


लातूर: काल भिमा-कोरेगावमध्ये झालेल्या किरकोळ वादातून दोन गट भिडले, दगडफेक, जाळपोळ झाले. अग्नीशमनची बसही पेटवण्याचा प्रयत्न झाला. त्याचे पडसाद काल औरंगाबाद, नांदेड आणि परभणीतही उमटले. आज लातुरच्या शासकीय गोदामासमोर आणि सम्राट चौकात संतप्त कार्यकर्त्यांनी वलांडी-शिरोळ-लातूर आणि उदगीर-लातूर या दोन एसटी बसेसवर दगडफेक केली. यात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. वलांडी-शिरुर अनंतपाळ बसच्या चालकाच्या डोळ्यात बसची काच घुसल्याचे वृत्त आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन लातूर बसस्थानकातील रिकाम्या बसेस आगाराकडे पाठवण्यात आल्या. आंबेडकर चौकात तरुणांनी केलेल्या या दगडफेकीत इतर लहान सहान वाहनांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या चौकात बराच काळ घोषणाबाजीही झाली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत स्थिती नियंत्रणात आणली. त्यासाठी सौम्य लाठीमारही केला. या घटनेचे वृत्त समजताच अनेकांनी आपापली दुकाने बंद केली. पोलिसांनी चौकशीसाठी सहा सात जणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींचा शोध घेणे चालू आहे अशी माहिती गांधी चौक पोलिसांकडून मिळाली.


Comments

Top