HOME   टॉप स्टोरी

औसा हनुमान कट्ट्याची पुन्हा हागणदारी करण्याचा प्रयत्न

मनपाच्या लायटी बंद, अंधाराचा घेतात लोक गैरफायदा, दोघांना बदडले!


लातूर: शहरातल्या औसा हनुमान मित्र मंडळाने मुख्य टपाल कार्यालय आणि गांधी चौक पोलिस ठाण्याच्या समोर असणार्‍या घाणीचे साम्राज्य हटवून सुंदरसा कट्टा तयार केला. रंगरंगोटी करुन सिमेंटचे उत्तम बाक बसवले. सकाळी-संध्याकाळी फिरायला येणारे अबालवृद्ध या कट्ट्यावरील बाकांवर विसावू लागले. विलस गोंदकर यांच्या प्रयत्नातून झालेल्या या उपक्रमाची आता चळवळ होऊ लागलीय. शहराच्या अनेक अशा घाण जागांचे कट्टे तयार होऊ लागले. पण मध्येच मनपाची नजर लागली आणि या कट्ट्यांच्या बाजुच्या खांबावरील दिवे बंद झाले. कारण काहीही असो पण रात्रीच्या या अंधाराचा गैरफायदा घेत पुन्हा लोकांनी या जागेत सू-शी उरकणं सुरु केलं. असे प्रकार करणार्‍या अनेकांना गोंदकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी हुसकावून लावलं. परवा तर अशी घाण करणार्‍या दोघांना चोपही दिला. मनपा खांबावरील दिवे सुरु करण्यास असमर्थ असल्यानं लोक घाण करु लागले. हा प्रकार घडू नये यासाठी गोंदकर आणि त्यांचे मित्र रात्री बारा वाजेपर्यंत कट्ट्यावर बसून असतात. रात्री बारापर्यंत जागरण करतात हे ठीक पण रात्रीचे अन पहाटेचे काय हा प्रश्न आहे. महापौरांना, नगरसेवकांनाही बोलून पाहिलं पण उपयोग होत नाही. परवा आयुक्तही हा कट्टा पाहून गेले पण त्यांच्यानेही प्रकाश पडला नाही! ही कट्ट्य़ांची चळवळ चालू राहिली तर शहराचं सौंदर्य वाढेल, घाणीचा निपटारा होईल आणि लोकांनाही शिस्त लागेल.


Comments

Top