HOME   टॉप स्टोरी

गिळंकृत हरित पट्ट्यांवर लक्ष, या पट्ट्यांवर करणार छोटी वनक्षेत्रं

ग्रीन बेल्ट किती, कुठे, काय आकाराचे, कुणाच्या ताब्यात, परत कधी मिळणार? सांगताहेत शैलेश स्वामी


लातूर: लातूर शहरातील ग्रीन बेल्ट अर्थात हरित पट्टे सहसा हरित दिसत नाहीत. शिवाय खुल्या जागांचाही अनधिकृत वापर केला जातो. परवा झालेल्या स्थायी समितीची सभेत हे पट्टे विकसित करण्यावर बरेच वादंग झाले, चर्चा झाले, स्थायी सभापतींशीही काहीजण भांडले. नेमका हरित पट्ट्यांचा विषय आणि प्रश्न काय आहे. यासाठी कधी निधी आला, किती आला, तो वापरला का गेला नाही, आता त्याच्या निविदा कशा निघाल्या, हरित पट्टे विकसित करणार म्हणजे नेमके काय करणार, पुढे त्यांची देखभाल कशी अन कोण करणार? अनेक हरित पट्टे गायब आहेत, त्यांचा शोध कसा घेणार, ते परत ताब्यात घेणार का? असे अनंत प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत अभ्यासू नगरसेवक शैलेश स्वामी यांनी. हरित पट्ट्यांचा विषय नगरपरिषद असल्यापासून चर्चिला जातो. लोकही कायम याबद्दल कुजबुजत असतात. पण नेमकी माहिती कुणाकडेच नाही. या मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय अधिकांना समजेल, नीटपणे समजेल असा प्रयत्न केला आहे.


Comments

Top