HOME   टॉप स्टोरी

कव्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, माहिती ठेवली दडवून

यहां किमत है गांव के इज्जत की, मजहब की, किसी की जान जाती है तो क्या हुआ?


लातूर: अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. अल्पवयीनच काय तर सज्ञान आणि कोवळ्या मुलांवरही अनैसर्गिक बलात्कार होत आहेत. असाच एक प्रकार सात दिवसंपूर्वी लातूरपासून जवळ असलेल्या कव्हा नावाच्या गावात घडला. सहा वर्षाच्या बालिकेवर वारंवार बलात्कार झाले. बलात्कार करणाराही अल्पवयीनच. दोघेही अल्पवयीन असले तरी लातूरच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बलात्कार करणार्‍या मुलाला ताब्यात घेण्यात आले. पुढची कारवाई कायदेशीर आणि रितसर झाली. पण गावकरी आणि पोलिसांनी हे प्रकरण दडवून ठेवले, याची वाच्यता होऊ दिली नाही. पोलिसांनीही चांगलीच काळजी घेतली. आम्हाला हे प्रकरण कळताच आम्ही पोलिस ठाणे गाठले. माहिती घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस माहिती द्यायला तयार नाहीत. दोन धर्मियात तेढ वाढेल, कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल म्हणून माहिती देणं अशक्य आहे असं सांगण्यात आलं. अशी किती प्रकरणं आजवर झाकून ठेवली? याचं उत्तर आज ना उद्या द्यावंच लागेल. लातूर जिल्ह्यात या दोन तीन वर्षात असे अनेक प्रकार घडले तेव्हा माहिती दिली गेली. ती पूर्ण होती का? आता दोन धर्मात भांडणे लागू नयेत म्हणून माहिती दिली जात नाही. इथपर्यंत ठीक आहे. पण अशा माहिती दडवण्याच्या प्रकारामुळं त्यांची हिम्मत वाढणार नाही का? हा खरा प्रश्न आहे.
हा प्रकार घडल्यानंतर गावात एका नामांकित पुढार्‍यानं बैठक घेतली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही बाजुंना समजाऊन सांगितलं. उद्या आरोपीच्या घरावर हल्ला होऊ नये, त्याच्या नातलगांच्या जिविताला धोका होऊ नये अशी काळजी घेत त्यांना गाव सोडायचा सल्ला दिला. त्यांनीही तो ऐकला. आता पुढे काय होतं ते पहावं लागेल.


Comments

Top