HOME   टॉप स्टोरी

विषबाधाग्रस्त शेतकर्‍याला अजित पवारांकडून एक लाख, आणखी प्रयत्न करणार

सरकार निष्क्रिय, वीज तोडणे थांबवा, मंत्र्यांना फिरु देणार नाही, आमच्यामुळेच कर्जमाफी, बोंडअळीची मदत


लातूर: औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील शेतकरी शहाजी राठोड यांनी महावितरणच्या वागणुकीला वैतागून विष प्राशन केले होते. त्यांची प्रकृती आजही चिंताजनकच असून आशिर्वाद रुग्णालयात जाऊन राष्ट्रवादीचे नेते अस्जित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनी राठोड यांची पाहणी केली. त्यांच्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. रुग्णाच्या औषधोपचारासाठी पवार यांनी एक लाख रुपयांची मदत दिली. ही रक्काम कमी असून आम्ही आणखी प्रयत्न करु असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा लातुरात आली असून आज औसा, अहमदपूर आणि उदगीर येथे सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने या नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पहिल्या टप्प्यात संघर्ष यात्रा काढली तेव्हा कर्जमाफीचा विषय होता. सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. त्यांना कर्जमाफी द्यायला भाग पाडले. नागपूरला हल्ला बोल केला तेव्हा कापसाच्या बोंड अळी प्रकरणी मदत जाहीर करावी लागली, सरकार काहीच करायला तयार नाही, रबीच्या तोंडावर शेतकर्‍यांचे विजेचे कनेक्शन्स तोडले जात आहेत, शेतकर्‍यांची वीज तोडणं थांबवावे लागेल, अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरणे मुश्कील होईल. आधीच्या संघरष यात्रेतील उपस्थिती आणि आताची उपस्थिती यात मोठा फरक आहे. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जीएसटी, नोटाबंदी यामुळे मोठा फटका बसला. बेरोजगारी वाढली आहे, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. आरक्षण देण्यात सरकारला अपयश आले आहे. हल्लाबोलमधून या बाबी आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत. औसा तालुक्यातील एकंबी येथील शेतकर्‍याला विजेचं मोठं बील आलं. महावितरणच्या कार्यालयात त्याला शिवीगाळ करण्यात आली. यामुळे वैतागून त्यानं विष पिलं. आम्ही त्याला एक लाखाची मदत केली. त्याच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री निधीतून मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते पण अशा प्रकरणात मदत मिळणार नाही असे सांगण्यात आले. त्याला दोन मुली, एक मुलगा आहे. अशा गरीब कुटुंबाची दखल घेतली जात नाही. सरकर कुणाकडेच लक्ष द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे असेही अजित पवार म्हणाले. यावेळी सुनील तटकरे, धनंजय मुंडे, नवाब मलिक, विक्रम काळे, राणा जगजितसिंह पाटील, मकरंद सावे, चित्रा पाटील, प्रशांत पाटील, बसवराज पाटील नागराळकर, बाबासाहेब पाटील उपस्थित होते.


Comments

Top