HOME   टॉप स्टोरी

जनावरे रस्त्यावर, कोंडवाड्यात कचरा, तोही जाळला, कचरा जाळणे सर्रास

लातुरच्या इज्जतीचा रोज कचरा, तोच कोंडवाडा पुन्हा सुरु करण्याचा मनपाचा प्रयत्न, मुहूर्त मात्र लागेना!


लातूर: लातूर शहराचं कचर्‍याचं व्यवस्थापन आता नीटपणे सुरु आहे. गल्लोगल्ली घंटागाड्या जातात कचर्‍याचं नियोजन करतात असं मनपाचे पदाधिकारी सांगतात. पण वास्तव वेगळेच आहे. शहराच्या विविध भागात कचरा बिनधास्तपणे जाळला जातो. तुम्ही बघताय ते दृश्य आहे पीव्हीआर थिएटरसमोरचं. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला दुपारी बारा वाजता बिनबोभाट कचरा पेटवून देतात. आम्ही असा कचरा नेहमीच जाळतो असं तिथले लोक सांगतात. यापेक्षा भारी गंमत पहा. लातूर जिल्हा बॅंकेच्या मागे मोकाट जनावरांचा कोंडवाडा आहे. या कोंडवाड्यात जनावरे नाहीत प्लास्टीकचा कचरा भरुन ठेवलेली पोती दिसतात. ही पोती अनेक महिन्यांपासून अशीच पडून होती. परवा कुणीतरी रात्रीच्या वेळी पेटवून दिली. सकाळपर्यंत तिथे फक्त राख उरली होती. इथे रात्री एक राखणदार असतो. त्यालाही पत्ता लागला नाही. जनावरे रस्त्यावर, कोंडवाड्यात मात्र कचरा. असा लातुरकरांच्या इज्जतीचा कचरा बिनधास्त होतो आहे. यावर स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर कचरा जाळणार्‍यांवर कारवाई करु आणि कोंडवाडाही लवकरच सुरु करु, त्यासोबतच कचर्‍याचे व्यवस्थापन करणारी कंपनी दोषी असेल तर त्यांच्यावरही कारवाई करु असं सांगतात.


Comments

Top