HOME   टॉप स्टोरी

एक दिवस न्यायालय बंद राहिल्यानं काय काय होतं?

वकिलांना संप करता येत नाही, बंद पाळता येत नाही, अनेक अडचणी, पक्षकारांचे मोठे नुकसान


लातूर: मुद्रांक शुल्कात मोठी वाढ झाल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील वकिलांनी आज असहकार पुकारला आहे. कुणीही कामात भाग घेत नसल्याने आज न्यायालयाचे कामकाज झाले नाही. वकिलांना नियमाने संप किंवा बंद पाळता येत नाही. वकील मंडळाचा एखादा सदस्य दगावला किंवा एखाद्या प्रकरणात निषेध करायचा असेल तर कामकाज बंद, असहकार अशी नावे पुढे करुन वकील मंडळी कामाव्त सहभागी होत नाहीत. आजही असाच असहकार पुकारण्यात आला. मुद्रांक शुल्क अन्यायकारक पद्धतीने वाढवण्यात आल्याने त्याचा फटका गरीब पक्षकाराला बसतो. अनेक पक्षकारांना खाण्याची भ्रांत असते, अनेकांच्या पायात चपलासुद्धा नसतात. अशा गरिबांनी काय करायचे असा प्रश्न वकील मंडळी करतात.
या संदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ जगन्नाथ चिताडे यांच्याशी आम्ही बातचीत केली. लातूर जिल्ह्यात साधारणत: ३० कोर्ट आहेत. रोज सरासरी ३००० लोक न्यायालयात येतात. यात पोलिस, पक्षकारांचा समावेश असतो. न्यायालयाचे कामकाज असे बंद राहिले तर या मंडळींचा जाण्या येण्याचा खर्च आणि वेळही वाया जातो. त्या दिवशीचे कामकाज पुढे ढकलले जाते, पेंडंसी वाढते. त्यातच उन्हाळा आणि दिवाळीच्याही सुट्या असतात. एकूणच कोर्टावर कामाचा बोजा अणि ताण वाढू लागतो. थकित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी रात्रीच्या न्यायालयाची कल्पना पुढे आली. ती मात्र टिकली नाही. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. आता तर मुद्रांक शुल्कही वाढले आहे. शारिरिक, मानसिक त्रासासह खिशालाही झळ पोचणार आहे.


Comments

Top