HOME   टॉप स्टोरी

देवीदास काळे यांनी घेतला प्रभारी महापौरपदाचा पदभार

लगेच घेतली शहरातल्या व्यापारी गाळेधारकांची बैठक


लातूर: महापौर अधिक काळ बाहेर असतील तर त्यांच्या कामांची जबाबदारी आपोआपच उप महापौरांवर येते. तद्वतच आज उप महापौर देवीदास काळे यांनी महापौरपदाचा प्रभारी म्हणून कारभार हाती घेतला. यावेळी आयुक्त अच्युत हंगे, विरोधी पक्षनेते दीपक सूळ, स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर, भाजपाचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी उपस्थित होते. महापौर कुणालाही न सांगता सिंगापूरला गेले. त्यांनी आयुक्तांनाही नीट कल्पना दिली नव्हती. काहीजणांना आपण मुंबईला जात आहोत असे सांगितले होते. ते सिंगापूरला महापौर परिषदेसाठी गेले आहेत याचा खुलासा उशिरा झाला. त्यांना परतायला वेळ लागणार असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत निर्णय कुणी घ्यायचा? असा प्रश्न होता. आज सर्व कारभार्‍यांचे एकमत झाले आणि त्यांनी काळे यांना महापौरांची खुर्ची दिली. प्रभारी महापौरपदी विराजमान होताच व्यापार्‍यांच्या बैठकीला ते सामोरे गेले. या व्यापार्‍यात गंजगोलाई, मिनी मार्केट आणि गांधी मार्केटमधील मनपा गाळेधारकांचे पदाधिकारी उपस्थित होते. या गाळ्यांचे नूतनीकरण, त्यासाठी लागणारी अनामत रक्कम आणि भाडे यावर विचार विनिमय झाला.


Comments

Top