HOME   टॉप स्टोरी

वैद्यकीय महाविद्यालयाला लोकनेते विलासरावांचे नाव, प्रस्ताव पाठवला

आ. अमित देशमुख यांनी घेतला महाविद्यालयाचा आढावा, औषधांसाठी सरकारकडून पुरेसा निधी मिळत नाही


लातूर: लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत चालणारे रुग्णालय असुविधांचे माहेरघर बनू लागले आहे. याही क्षेत्राकडे सरकारचे दूर्लक्ष होत असल्याचे आ. अमित देशमुख यांनी सांगितले. आ. देशमुख यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेतली. या बैठकीत दवाखाना आणि महाविद्यालयाच्या वरिष्ठांनी सद्यस्थिती सांगितली. अडचणीही सांगितल्या आणि संस्थेनं केलेल्या प्रगतीचाही आढावा मांडला. या दवाखान्याला जेवढा निधी आवश्यक असतो तेवढा मिळत नाही. औषधांसाठी सहा कोटी रुपयांची आवश्यकता असते पण त्याची पुरेशी तरतूद केली जात नाही. शिवाय या रुग्णालयात घुशींचा आणि परिसरात डुकरांचा मोठा वावर आहे. त्याकडे अधिष्ठाता लक्ष देतीलच. महानगरपालिकेच्या सहकार्याने त्यांचा बंदोबस्त केला जाईल. या रुग्णालयासाठी आवश्यक असणारा निधी केंद्राकडून आणि राज्याकडून दिला जात नाही. यासाठी आम्ही अनेकदा आग्रह धरला, पत्र पाठवली, सरकारच्या नजरेस आणून दिलं. या अडचणी मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आभि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्याही नजरेस आणून देऊ अशी माहिती आ. अमित देशमुख यांनी दिली.
लातुरातील आधीचे जिल्हा रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत चालते. त्यामुळ आता जिल्हा रुग्णालय नाही. नांदेड मार्गावर शेतकी शाळेची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यांची जागा घेऊन त्यांना दुसरी जागा दिली जाईल, वर्षभरात जागा उपलब्धही होईल असेही आमदारांनी सांगितले.


Comments

Top