HOME   टॉप स्टोरी

स्वच्छ लातुरला मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून बक्षीस?

नेहमीप्रमाणे पश्चिम लातुरवर मेहेरबानी, पूर्व भाग स्वच्छतेतही दूर्लक्षित!


लातूर: स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत साफसफाई, डागडुजी आणि रंगरंगोटी सुरु आहे. शहरातला कचरा मार्गी लावणे, चौक सुशोभित करणे, रस्ता दुभाजकात झाडे लावणे असे उपक्रम राबवले जात आहेत. यासोबतच स्वच्छ प्रभाग स्पर्धाही जाहीर करण्यात आली आहे. यासाठीच परवा आयुक्तांनी कचरा डेपोवर नगरसेवकांची बैठकही घेतली होती. शहरातील चौक आणि रस्ते दुभाजक वेगवेगळ्या व्यावसायिकांना सजवण्यासाठी देण्यात आले आहेत. व्यावसायिकांनीही शहराच्या पश्चिम भागालाच प्रधान्य देण्यात आले. पूर्व भाग अजूनही दुर्लक्षितच आहे. पश्चिम भागाच्या तुलनेत पूर्व भागात फारशी कामे होताना दिसत नाहीत. अनेक दुभाजकांचे लोखंड अजूनही गायब आहे. या दुभाजकात मोकाट जनावरे आणि गाढवांचा वावर असतो. अनेक ठिकाणी कचरा तसाच पडला आहे. सरकारी गोदामाजवळ बांधण्यात आलेली सार्वजनिक शौचालये रंगवण्यात आली आहेत. या गोदामाच्या उजाड भिंतींना ताज्या रंगांचा लेप देण्यात आला आहे. त्यावर स्वच्छतेचे संदेश रंगवणं सुरु आहे. औसा मार्गावर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी काही दुकानांसमोर अचानक कचरा पेट्या आणून ठेवल्या आणि जरा लक्ष ठेवा अशी विनंती करुन ते गेले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, औसा आणि उदगीरचे सर्वेक्षण झाले आहे. १५ फेब्रुवारीला निलंगाचा नंबर आहे. त्यानंतर लातुरचा सर्वे करण्यात येणार आहे. लातुरातील स्थिती पाहता यात बक्षीस मिळेल ना मिळेल पण लातूर महानगरपालिकेने केलेले प्रयत्न पाहता मुख्यमंत्री खास बाब म्हणून नक्कीच बक्षीस देतील अशी अपेक्षा आहे.
Watch selective vdo stories on Youtube, search aajlatur.


Comments

Top