HOME   टॉप स्टोरी

उड्डाण पुलावरुन उडी मारुन आत्महत्या

उडी मारण्यापूर्वी अनेकांनी विनवलं, सकाळी साडेसहाची घटना


लातूर: आजच्या सकाळची सुरुवात आत्महत्यने झाली. लातूर शहर तसं भल्या पहाटेच कामाला लागतं. सहाच्या सुमारासही शिवाजी चौक गजबजलेला असतो. बाहर गावहून येणार्‍या जाणार्‍या गाड्या, वर्तमानपत्रे वितरीत करणार्‍यांची गडबड, कामाची प्रतिक्षा करीत थांबणारे रोजगारी, सफाई कामगार, छोटी मोटी हॉटेल्स उघडण्याची घाई सुरु असते. अशातच एक अपंग वृद्ध शिवरायांच्या पुतळ्याकडे तोंड करुन उड्डाण पुलाच्या कठड्यावर येऊन थांबला. पुतळ्याच्या रक्षेसाठी मनपाने नेमलेले लक्ष्मण वाघमारे आणि अनेकांनी त्याला विनवलं. त्याला ओरडून खाली येण्यास सांगितलं पण त्याने ऐकले नाही. त्याने क्षणार्धात पुलावरुन खाली उडी घेतली. डोके फुटले, जबर मार लागला. त्याला तातडीने रुग्णवाहिका बोलावून सर्वोपचार रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. ६२ वर्षांच्या या बाबूराव रामकृष्ण वारे यांचं तोवर निधन झालं होतं. ते सावेवावडीचे रहिवासी होते. त्यांच्या एका पायाला गॅंगरीन झाले होते त्यामुळे ते त्रस्त होते कुबड्या घेऊन बाबूराव पहाटेच घराबाहेर पडले उड्डाण पुलावर चपला आणि कुबड्या सोडून त्यांनी उडी मारली यातच त्यांचे निधन झाले हा सारा प्रकार सीसीटीव्हीत चित्रित झाल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे


Comments

Top