HOME   टॉप स्टोरी

नोकर कपात रद्द करा, पोलिस भरती करा, सेवा पदांची संख्या वाढवा

एमपीएस्सी विद्यार्थ्यांच्या एल्गार मोर्चात हजारो सहभागी, विविध जिल्ह्यातून सहभाग


लातूर: स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनी आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विविध जिल्ह्यातून आलेल्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनेक मागण्या केल्या आहेत. राज्य सेवा पदांच्या संख्येत वाढ करा, पीएसआय, एसटीआय, एएसओ, कर सहाय्यक, लिपीक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क या पदांच्या स्वतंत्र परिक्षा घेवून अधिक जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करावी, शिक्षकांच्या रिक्त २३४३५ जागा तातडीने भराव्यात, एमपीएस्सी परिक्षेसाठी बायोमेट्रीक पद्धतीने हजेरी घ्यावी, तलाठी पदाची परिक्षा एमपीएस्सी द्वारे घेऊन जास्तीत जास्त पदांची जाहिरात काढावी, एमपीएस्सी ने सी-सॅट या विषयाचा पेपर यूपीएसस्सी च्या धर्थीवर पात्र करावा, स्पर्धा परिक्षातील डमी रॅकेट प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करावी, आयोगाकडून जे प्रश्न चुकतात किंवा रद्द करण्यात येतात त्याचे आयोगाने संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे, ३० टक्के नोकर कपातीचे धोरण रद्द करावे, पोलिस भरतीच्या १२ हजार जागा तात्काळ भराव्यात, सरळ सेवा भरतीच्या जागा तात्काळ भराव्यात, राज्य शासनाने प्रत्येक पदासाठी यादी लावावी, एमपीएस्सीने तामिळनाडू लोकसेवा आयोगाचा पॅटर्न राबवावा अशा मागण्या या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
Youtube वरही उपलब्ध, search करा aajlatur


Comments

Top