HOME   टॉप स्टोरी

व्हॅलेंटाईनवर प्रियाचं राज्य, राहूल गांधींचीही झाली चेष्टा

प्रिया म्हणते, फक्त भुवया उडवायच्या डोळा मारायचं ठरलं नव्हतं....


व्हॅलेंटाईनवर प्रियाचं राज्य, राहूल गांधींचीही झाली चेष्टा

मुंबई: ‘ओरु अदार लव्ह’ नावाचा एक मल्याळम सिनेमा तयार होतोय. या सिनेमातलं एक गाणं रिलिज झालंय. या गाण्यानं तरुणात, सिने शौकिनात धमाल उडवून दिली आहे. क्लासरुममध्ये बसलेली अभिनेत्री नटाला नजरांनी खुणावता खुणावता अलगद डोळा मारते. हा पंधरा वीस क्षणांचा सील करोडोंचं काळीज चिरण्याचं काम बेमालूमपणे करतोय. प्रिया प्रकाश वारियर असं या अभिनेत्रीचं नाव आहे. अवघ्या १८ वर्षाच्या ही कन्या बी कॉमला शिकतेय. थ्रिसूरचे रहिवासी असलेल्या प्रियाच्या कालच्या व्हिडिओची लोकप्रियता पाहता निर्मात्यांनी मोठ्या चलाखीने आज व्हॅलेंटाईन डे निमित्ताने दुसरा व्हिडीओ रिलीज केला, व्हायरल केला, त्याला एवढा प्रतिसाद मिळतोय की इन्स्टाग्राम वाहून जाण्याची वेळ आली आहे. या गाण्यात एकमेकांना पाहून फक्त भुवया उडवायच्या एवढंच ठरलं होतं, डोळा मारायचा नव्हता, ते उत्स्फूर्तपणे झालं असं प्रियानं एका मुलाखतीत सांगितलं.
दरम्यान हैद्राबादेतील एका मुस्लीम गटानं प्रियाच्या अभिनयावर आक्षेप घेतला आहे. तिच्या गाण्यामुळं मुस्लीम समाजाच्या भावना दुखावतात. या गाण्यावर बंदी घालावी आणि प्रियावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तशी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
रिकामटेकड्या कलावंत नेटकर्‍यांनी प्रियालाही सोडलं नाही. प्रियाच्या व्हिडीओत राहूल गांधी, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनाही घुसडलंय. एका व्हिडिओत प्रिया डोळा मारतेय आणि राहूल हसतात अशी एडीटींग करण्यात आलीय. दुसर्‍या एका व्हिडीओत मोदी लाजतात असं दाखवलंय. प्रियाच्या व्हिडीओप्रमाणेच हे सगळे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहेत. प्रियाचा व्हिडीओ रिलीज व्हायला आणि व्हॅलेंटाईन डे यायला एकच गाठ पडल्यानं आज प्रिया खरी हिरो झाली आहे.


Comments

Top