HOME   टॉप स्टोरी

छिंदमच्या विरोधात लातुरचे मार्केट यार्ड बंद, फाशीची मागणी

गुमास्ते, व्यापारी, हमालांनी आडती केल्या बंद, बाजारातील व्यवहार ठप्प


लातूर: ऐन शिवजयंतीच्या तोंडावर अहमदनगरचे उप महापौर श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याने सबंध महाराष्ट्र खवळला होता. त्याचे पडसाद लातुरातही उमटले. गांधी चौकात छिंदमच्या प्रतिमेला जोडे मारुन तिचे दहन केल्यानंतर आज मार्केट यार्डात संताप व्यक्त करण्यात आला. दीपक आळणे, प्रदीप शिंदे या गुमास्तांच्या नेतृत्वाखाली यार्डात छिंदमची प्रतिकात्मक अंतयात्रा काढून शिवनेरी गेटमध्ये दहन करण्यात आले. हे सारे सुरु असताना बहुतांश व्यापारी, आडते आणि इतर घटकांना काय होणार याची कल्पना आली होती. तरीही काही लोकांनी दुकाने उघडी ठेवल्याने गुमास्त्यांच्या या जमावाने उघड्या असलेल्या दुकानांना बंदचे आवाहन केले. काही ठिकाणी तर कार्यकर्त्यांनी स्वत:च जाऊन शटर खाली ओढले. छिंदमला फाशी द्यावी अशी मागणी आळणे यांनी केली. सरकारला हे जमत नसेल तर त्याला आमच्या ताब्यात द्यावे आम्ही काय करायचं ते करु असं शिंदे म्हणाले. आज बाजार बंद राहिल्याने सगळीकडे शुकशुकाट होते, सौदा निघाला नाही, व्यवहार झाले नाहीत.


Comments

Top