HOME   टॉप स्टोरी

या, बायकांचा मार खा, मगच होईल लग्न!

बंजारा समाजाने मनोभावे सांभाळली प्रथा, खेळ तो खेळ अन परंपराही!


लातूर: भारताच्या अनेक समाजात अनेक प्रथा आहेत, परंपरा आहेत. काही गमतीदार, काही अघोरी तर काही मनोरंजन करणार्‍या. अशीच एक परंपरा बंजारा समाज सांभाळत आहे. या प्रथेला म्हणतात धुंड. तिचा नीट अर्थ घेतला तर त्यांच्या समाजातली ती मुंजच. जी होळीच्या दुसर्‍या दिवशी केली जाते. मैदानामध्ये दोन लाकडी खुंट बांधलेले असतात. त्याच्या मधोमध एक कळशी, कळशीत रुपयाचं नाणं आणि त्या दिवशी केलेले गोडधोड असते. आता हा रुपया आणि मिठाई पळवण्यासाठी तरुणात स्पर्धा सुरु होते. त्या कळशीजवळ जो आला त्याला काठीचा प्रसाद मिळतो. काठी झेलत किंवा चुकवत कळशी गाठायची, सोडवायची, त्यातला रुपया काढून घ्यायचा. नाहीच जमलं तर मिठाई तरी पळवायची. असा हा सारा प्रकार. या प्रयत्नात अनेकांच्या पाठी सोलून निघतात. अनेकांच्या शरिरावर कुठेही झपके बसतात! ही प्रथा कशासाठी? मिठाई किंवा रुपया पळवणारे असतात उपवर तरुण. या प्रथेतून-खेळातून बाहेर पडल्याशिवाय त्याचं लग्नंच होत नाही. आता बोला. लग्न करायचं तर मार खावाच लागेल! दुसरीकडे लोक बायकांना बदडत असतात आणि इकडे बायकांचा मार खाल्ल्याशिवाय लग्नच होत नाही!


Comments

Top