HOME   टॉप स्टोरी

बघता बघता दगडफेक, बाजार बंद, लगेच सुरळीत!

नेमके काय झाले ते अखेरपर्यंत कुणालाच कळाले नाही!


लातूर: स्थळ शिवाजी चौक. संध्याकाळी साडेपाचची वेळ. बघता बघता दगड आले, रिक्षा वाहने जागेवरच थांबली. लोक पटापट उतरुन धावू लागले. त्यांणा बघून दुसरे पळू लागले, काहीतरी आक्रित घडलं असावं या भितीने चौक गतीमान झाले. सगळा गोंधळ बघून गाफील पोलिसही सैरभैर झाले. अन मग कुमक वाढली. गोंधळ करणारा जमाव गोलाईच्या दिशेने निघाला,, त्यांणा बघून दुकानेही पटापट बंद होऊ लागली. हीच स्थिती अशोक हॉटेल, गांधी चौक, हनुमान चौक आणि गोलाईतही दिसू लागली. क्षणात सुरु झालेला गोंधळ काही क्षणात संपला. जबरदस्तीने दुकाने बंद करणार्‍या चौघांना अटक करण्यात आली. संतप्त जमाव जात असताना दुकाने बंद होत होती. जमाव पुढे जाईल तशी दुकाने उघडत गेली. आता सारे सुरळीत आहे. नियंत्रणात आहे.
का घडलं हे सारं?
लोकसंख्या नियंत्रण कायद्यासाठी एक यात्रा निघाली आहे. ती काल लातुरात होती. त्यांनी स्वाक्षरी मोहीम घेतली. नांदेडहून आलेली ही यात्रा लातुरमार्गे पुढे तेलंगणात गेली. तिथे मुख्य संयोजकांपैकी काहीजणांना पोलिसांनी मारहाण केली. त्याचे पडसाद लातुरात उमटले.....असं सांगतात. अद्याप याला दुजोरा मिळाला नाही.


Comments

Top