HOME   टॉप स्टोरी

कालच्या मिनी दंग्यातील ०८ आरोपींना पोलिस कोठडी

१९ जण फरार, शोधासाठी पथक निघाले, दहशतीचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला


कालच्या मिनी दंग्यातील ०८ आरोपींना पोलिस कोठडी

लातूर: काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शिवाजी चौकात दगडफेक करुन सबंध शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार्‍य़ा टोळक्यापैकी आठजणांना गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्य़ात आली आहे. आणखी १९ जण फरार आहेत. त्यांना शोधण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. काल दहशतीमुळे दुकाने बंद होत असताना गांधी चौक पोलिस ठाण्याचे पीआय सुनील नागरगोजे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी व्यापार्‍यांना आवाहन करीत बाजार चालू ठेवला. अटक करण्य़ात आलेल्यांध्ये नितीन मोहनाळे, करण् आल्टे, कृष्णा खानापुरे, प्रशांत डोईजोडे, शैलेश तिवारी, अभय तिवारी, आकाश सुरवसे आणि आकाश गायकवाड यांचा समावेश आहे. एकूण २७ जणांवर् गुन्हा दाखल झाला आहे. त्यापकी आठ सापडले आहेत. बाकी १९ फरार् आहेत.


Comments

Top