HOME   टॉप स्टोरी

रोजगारासाठी स्थलांतर थांबेल, १५ हजार जणांना नोकर्‍या

लातुरात मेट्रोसाठी होणार रेल्वे कोच तयार, परदेशातही करणार निर्यात- पालकमंत्री निलंगेकर


लातूर: जिल्ह्यासह मराठवाड्यातील तरुणांना रोजगारासाठी स्थलातरीत व्हावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन येथील बेरोजगारांना येथेच रोजगार प्राप्त व्हावा याकरीता लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पाची उभारणा करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भुमिपुजन शनिवार दिनांक ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे, असे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकल्पामुळे केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर मराठवाड्याच्या विकासाची सुरुवात होणार आहे. या एैतिहासिक सोहळ्यास लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे. हा प्रकल्प दोन हजार एकर जागेत उभारण्यात येत असुन त्यांच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु करण्यात येत आहे. तीन टप्प्यात उभारण्यात येणार्या या प्रकल्पामुळे जवळपास १५००० युवकांना थेट रोजगार तर अप्रत्यक्षपणे ३५ ते ४० हजार जणांना रोजगार प्राप्त होणार आहे. मॅग्नेटीक महाराष्ट्र यामध्ये झालेल्या करारानुसार या प्रकल्पात ८० टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ६०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. या प्रकल्पात मॅट्रो साठी आवश्यक असणारे कोच बनविण्यात येणार असुन या प्रकारचे कोच बनविणारा देशातील हा पहिलाच प्रकल्प राहणार आहे. यापुर्वी मेट्रोचे कोच परदेशातून निर्यात करण्यात येत होते. आता या प्रकल्पामुळे आपल्या देशातच हे कोच बनविण्यात येणार असल्याने आगामी काळात या प्रकल्पाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर परदेशात सुध्दा हे कोच आयात करण्यात येणार असल्याने भविष्यात हा प्रकल्प केवळ लातूर जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या कोच प्रकल्पाचा एैतिहासिक भुमिपुजन सोहळा लातूर येथील जिल्हा क्रिडा संकुलाच्या मैदानावर दिनांक ३१ मार्च रोजी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर पार पडणार असुन या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवंराची उपस्थिती राहणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाची गुढी उभारण्याची संधी जनतेला मिळत असुन या सोहळ्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे. महिला तंत्रनिकेतन लातूर हे बंद होणार नाही त्याबद्दची बोलणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून हे कसं थांबवता येईल याबातचा प्रयत्न चालू आहेत. शिवसेना सहसंपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी केलेल्या आरोपांवर बोलण्यापेक्षा कामातूनच त्यांना उत्तर देऊ असे म्हणाले.यावेळी महापौर सुरेश पवार , भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी , मनपा सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे , नगरसेवक गुरुनाथ मगे , प्रवीण कस्तुरे , ज्योती पांढरे , प्रेरणा होनराव उपस्थित होते.


Comments

Top