HOME   टॉप स्टोरी

आठ फूट लांब अन दिडशे किलो! बटनपुरात मगर जेरबंद

कर्नाटकातून येतात मगरी, पाणी कमी झाल्याने फिरतात शेतीत


लातूर: लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील मांजरा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून मगरीचा मुक्त संचार आहे. यामुळे नदीच्या आजूबाजूच्या शेतकर्‍यात दहशतीचे वातावरण पसरल्र आहे. कारण यापूर्वी या परिसरात वाईल्ड लाइफ कॉंझर्वेशन सोसायटीच्या उदगीर तालुक्यातील सर्पमित्रांनी देवणी तालुक्यातील मांजरा नदीच्या पात्रातून तीन मगरीना निसर्गाच्या सानिध्यात सोडले होते. काल पुन्हा देवणी तालुक्यातील बटनपुरात सकाळी नदी किनाऱ्यावरील गावच्या सरपंचाच्या नदीलगत शेतात केलेल्या पाण्याच्या खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती लातुरातील प्राणिमित्रणा मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता मगर आढळली. तिला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी पाच तास अथक मेहनत करावी लागली. या भागात नदी किनार्‍यावरील शेतात अनेक पशुधन या मगरीने मारले होते. आता शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. मात्र अशा अनेक मगरीचा संचार महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील नदीपात्रातील पाणी खळवल्यामुळे नदीकाठच्या शेतीमध्ये मगरीचा वावर वाढला आहे. या मगरी कर्नाटकातून येत असल्याचे बोलले जात आहे. ही मगर आठ फूट लांब असून जवळपास १५० किलो वजनाची आहे. याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. ते अद्याप घटनास्थळाकडे गेलेच नाहीत. प्राणीमित्र ही मगर आता वनविभागाचया ताब्यात देणार आहेत. ही मगर सुरक्षित बाहेर काढण्यासाठी वाइल्ड लाइफ कंझर्वेशन सोसायटी, लातूर अंतर्गत कार्य करणारी भीमाशंकर गाढवे, बाबा सय्यद, दीपक कासराळे, अभिजीत कासराळे, आशिष कल्लूरे, सचिन सुरनर, मनोज पाखरे आदींनी परिश्रम घेतले.


Comments

Top