HOME   टॉप स्टोरी

सलमानला सत्संग, आसारामांच्या बराकीत रात्रीचा मुक्काम!

जामीनासाठी केला अर्ज, उद्या होणार सुनावणी पण आज दाल रोटी फिक्स!


मुंबई: २० वर्षांपूर्वी केलेल्या काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता (?) सलमान खानला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. असे असले तरी उद्या सलमानला जामीन मिळू शकतो पण आज तरी जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात रात्र काढावी लागणार आहे. आज त्याला जेवणात भाकरी, वांग्याची भाजी वरण मिळेल. याच बराकीत आसारामबापूही आहेत. नाईलाजाने का होत नाही त्याला सत्संग घडणार आहे. बाकीचे कुणी असो किंवा नसो हे दोघे तरी आज ‘हम साथ साथ है’ असे नक्की म्हणतील.
२० वर्षांपूर्वी बिष्णोई समाजाचे पूनमचंद लघुशंकेसाठी बाहेर आले आणि त्यांनी सलमनला शिकार करताना पाहिले. त्यांचीच साक्ष महत्वाची ठरली. त्यांनी जीपचा नंबर टिपून ठेवला होता. या जीपमध्ये तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे बसले होते अशी माहिती त्यांनी न्यायालयाला पुरवली होती. बिष्णोई समाज काळविटाची पूजा करतो यामुळे सलमानच्या जिवाला धोका आहे असे बोलले जाते. त्याच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. न्यायालयाचा निर्णय ऐकल्यानंतर सलमान खान रडला, त्याच्या बहिणींनाही अश्रू अनावर झाले होते. २० वर्षांपूर्वी हम साथ साथ हैच्या चित्रिकरणावेळी सलमानने काळविटांची शिकार केली होती. याबाबतच्या डॉक्टरांच्या अहवालात कळविटांचा मृत्यू बंदुकीच्या गोळीने झाला असे म्हटले नव्हते. पण दुसर्‍या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. या प्रकरणात सलमानला शिक्षा झाल्याने वन्यजीव संवर्धनाचा कायदा आणि त्याची निकड अधोरेखित झाली आहे. यातून सलमान सुटला असता तर समाजात वेगळाच संदेश गेला असता.


Comments

Top