logo
news image किल्लारी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के news image राज्यात जिल्हा न्यायालय परिसरात पोस्टाची कार्ये सुरु करण्याची मागणी news image लातूर-जहिराबाद रस्त्याचे काम बंद ठेवण्याची मागणी news image जनसंपर्क अभियान राबवण्याबाबत आज लातुरच्या कॉंग्रेसभवनात दोन वाजता बैठक news image लातूर जिल्हा महिला कॉंग्रेस कार्यकारिणी जाहीर news image मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी news image राफेल प्रकरणी आज भाजपाच्या ७० ठिकाणी पत्र परिषदा news image राज्यातील अधिक कांदा खरेदी करण्याचा राज्याला आदेश news image शिवडी येथे संभाजी भिडे यांच्या कर्यक्रमात भीम अर्मीच्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रमात गोंधळ news image भू माफियावर कारवाई करण्याची अभिनेत्री सायराबानो यांची पंतप्रधानांकडे मागणी news image खोटेपणा हा कॉंग्रेसचा पाया- राफेल प्रकरणी पंतप्रधान news image देशातील महत्वाच्या संस्था उध्वस्त होऊ देणार नाही- राहूल गांधी news image कोल्हापुरच्या मिसळीची गिनिज बुकात नोंद news image गितांजली खन्ना यांच्या पर्थिवावर अंत्यसंस्कार news image यवतमाळमध्ये पोलिसांवर हल्ला करणार्‍या दोघांना अटक news image नागपुरात खासदार महोत्सवात हेमा मालिनी यांनी सादर केले दुर्गा नृत्य

HOME   टॉप स्टोरी

आज जन्मलेल्या मुलींना पैंजण, मातांना साड्या!

लोकनायकचा अभिनव उपक्रम, सरकारी दवाखान्यातल्या माता सुखावल्या!

लातूर: आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. मुलगी वाचवा, मुलगी वाढवा, मुलगी शिकवा हा नव्या जमान्याचा नवा मंत्र जपत लातुरच्या लोकनायक संघटनेनं आज अभिनव उपक्रम राबवला. आज सरकारी दवाखान्यात जन्मलेल्या मुलींना या संघटनेनं पैंजणांचा आहेर केला तर त्यांच्या मातांना साड्या देऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला. लातूर येथील सर्वोपचार रुग्णालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंती निमित्ताने लोकनायक संघटनेच्या वतीने १४ एप्रिल रोजी जन्मास येणार्‍या २७ मुलींना चांदीचे पैजण भेट करन्य़ाआट आले. मुलींच्या आईला खन नारळ आणि साडी भेट देण्यात आली. ‘बेटी बचाव-बेटी पढाव’ या अभियाना अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील स्त्रीभृण हत्या थांबावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असे अजित घार म्हणाले. प्रत्येकास आई-बहिण-बायको पाहिजे तर मग मुलगी का नको? असा सवाल किसन कदमांनी उपस्थित केला. समाजामध्ये दिवसेंदिवस स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यावर कुठे तरी प्रतिबंध आला पाहिजे. समाजात स्त्रियांचा दर्जा वाढवला पाहिजे, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आपणच सर्वांनी घ्यावी लागेल असे ते म्हणाले. यावेळी महादू रसाळ, शिवा चवरे, बंटी गायकवाड, रवी लहाने, किसन कदम, नेताजी जाधव, अनूप घोडके, प्रमोद जोगदंड, अमोल गायकवाड, लखन शिरसाट, श्रीराम माने उपस्थित होते.


Comments

Top