HOME   टॉप स्टोरी

सीआरपीएफच्या स्विमिंग पुलात बुडून मुलाचा मृत्यू

हलगर्जीपणा, आपत्ती निवारण करणारे बोलावतात अग्नीशामक दलाला!


सीआरपीएफच्या स्विमिंग पुलात बुडून मुलाचा मृत्यू

लातूर: लातूरच्या मांजरा साखर कारखाना परिसरात असणार्‍या सीआरपीएफ कॅम्पमध्ये असणार्‍या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या येथील कर्मचार्‍याच्या पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ३० एप्रिल रोजी दुपारी ०२.३० च्या सुमारास घडली. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असून या सीआरपीएफ मध्ये सेवेत असणार्‍या संतोष भगवान मोटे यांच्या पुतण्याचा येथील प्रशासना हलगर्जीपणामुळे स्विमींगपूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. कालपर्यंत ही बातमी दाबून ठेवण्यात आली होती. या घटनेत हलगर्जीपणाचा महाकळस झाला. सीआरपीएफचे हे आपत्ती निवारण प्रशिक्षण केंद्र आहे. बुडालेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी सीआरपीएफने लातुरच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. तुम्ही आमच्या पेक्षा श्रेष्ठ आहात, तुमचे प्रशिक्षण आमच्यापेक्षा कैकपट अधिक आणि अद्ययावत आहे असं सांगत लातुरच्या अग्नीशामक दलानेही मदत करण्यास नकार दिला!
मांजरा कारखान्याच्या पाठीमागे असणार्‍या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात सेवेवर असणारे संतोष भगवानराव मोटे यांचा पुतण्या आदित्य अमर मोटे हा उन्हाळ्याच्या सुट्‌ट्या दरम्यान आपल्या काकाकडे आला होता. या दरम्यान आदित्यचे काका संतोष मोटे हे ड्युटीसाठी मध्यप्रदेशात गेले होते. बुधवारी ३० एप्रिल रोजी आदित्य आणि येथील काही मुले सीआरपीएफ कॅम्पसमध्ये असलेल्या स्विमींग पुलावर पोहण्यासाठी गेले. येथील खबरदारी घेणार्‍या प्रशासनाने काळजी घेतली नाही वा लाईफ सेवरने हलगर्जीपणा केल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मृत आदित्याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी करुन त्याचा मृतदेह पालकांच्या हवाली करण्यात आला आहे. त्यानंतर गुरूवारी आदित्यच्या गावी सोलापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. नुकतीच इयत्ता १० वीची परिक्षा दिलेल्या आदित्यच्या या अपघातील मृत्यूने त्यांच्या कुटूंबावर संकट कोसळले आहे. या स्विमींग पूलकडे दूर्लक्ष करणार्‍या किंवा आपल्या सेवेत कसूर करणार्‍या संबंधित प्रशासनावर व अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी संबंधीत बालकाच्या माता पित्याकडून केली जात आहे.


Comments

Top