HOME   टॉप स्टोरी

लातुरात अ‍ॅटोमॅटीक कचरा दाहिनी, फायर ब्रिगेडचे सहकार्य!

विशेष मालिका: कचरा महोत्सव भाग: ०१, मित्रनगर, खोरी गल्ली, दयानंद गेट



लातूर: शहरात कचरा व्यवस्थापनाच्या कामी नवी एजन्सी रुजू लागल्यानंतर कचरा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येऊ लागला. शहरात अनेक ठिकाणी कचरा स्पॉट तयार झाले आहेत. त्या ठिकाणी कितीदाही कचरा उचलला तरी पुन्हा ढीग कायमच असतो. आम्ही आजपासून ‘कचरा फेस्टीव्हल’ अभियान सुरु केले आहे. या अंतर्गत जा खोरी गल्लीतील कचरा स्पॉट, बाजुलाच असलेल्या मित्रनगरचा स्पॉट चित्रित केला. मित्रनगरच्या या नालीतून दोनच दिवसांपूर्वी तीन ट्रॅक्टर कचरा उपसण्यात आला होता. आता ती नाली पूर्ववत भरुन गेली आहे. लोकही याकडे गंभीरपणे पहात नाहीत हा नेहमीचा अनुभव आहे. यापेक्षा भारी गम्मत पुढे आहे. दयानंद महाविद्यालयाजवळ जो रेल्वे रुळाचा रस्ता आहे. त्यावर डिव्हायडर तयार करण्यात आले आहेत. या डिव्हायडरच्या फक्त दोन भिंती आहेत. आतला भाग रिकामा आहे. या रिकाम्या डिव्हायडरमध्ये आजुबाजुला बसणारे भाजीवाले कचरा टाकतात, त्यांचं बघून बाकीचेही टाकतात. हा कचरा जेव्हा बाहेर यायला लागतो तेव्हा कुणीतरी पेटवून देतो. आग पसरत जाते मग कुणेतरी फायर ब्रिगेडला फोन करतो. ते लोक येतात कचरा विझवून जातात!


Comments

Top