logo
news image पावसात व्यत्यय येण्याची शक्यता, अल निनो वादळाचे सावट news image गोकुळ दूध संघाच्या अंदोलनाला खा. राजू शेट्टी यांचा एक दिवसाचा पाठिंबा news image दुधाला लिटरमागे पाच रुपायांची वाढ द्या- राजू शेट्टी news image मुंबईच्या समुद्राला आज सर्व लाटांचं तांडव सुरु, पालघरध्ये अनेक घरात समुद्राचे पाणी! news image आषाढी एकादशीच्या वारीसाठी पोलिसांनी तयार केले खास अ‍ॅप, अ‍ॅपमध्ये सगळ्य़ा सुविधा news image मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्यामुळे पालघरात तिघे जखमी

HOME   टॉप स्टोरी

मुख्यमंत्री जलनायक, पालकमंत्र्यांनी दिली उपाधी!

मुख्यमंत्र्यांनी घेतला इंद्रप्रस्थ योजनेचा आढावा, योजना भविष्यात राज्यभर राबवणार

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलनायक आहेत. त्यांनी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यातील हजारो खेडी पाणीदार केली, दुष्काळ हटवला. हे मोलाचे काम असून ते खरे जलनायक आहेत असे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले. जलयुक्त शिवारची योजना यशस्वी करणारे कार्यकर्तेच खरे जलनायक आहेत असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले. औसा मार्गावरील एका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लातूर जिल्हा आज टॅंकरमुक्त झाला आहे. हे सर्वांचे योगदान आहे. संभाजी पाटील यांनी राबवलेली जलयुक्त शिवार ही योजना अतिशय फलदायी आहे. हा लातूर पॅटर्न आहे. तो आम्ही महाराष्ट्रभर राबवण्याचा प्रयत्न करु असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मंत्री राम शिंदे, खा. सुनील गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातुरे, महापौर सुरेश पवार, अभिमन्यू पवार, गुरुनाथ मगे, शैलेश लाहोटी उपस्थित होते.


Comments

Top